विराटचे अनुष्कावरचे ट्विट ठरले 'गोल्डन ट्विट' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

अनुष्काची बाजू घेत 'अनुष्काची खिल्ली उडवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', अनुष्काकडून मला नेहमीच सकारात्मकता शिकायला मिळाली आहे', असे टि्वट करुन विराटने टीकाकारांना उत्तर दिले होते.

नवी दिल्ली - आजकाल कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीचे ट्विट चर्चेत असतेच. मग कोणाच्या ट्विटला किती लाईक्स मिळाले किती रिट्विट झाले याच्याही चर्चा सोशल मिडियावर रंगतात. परंतु या सगळ्यांमध्ये विराटने कोहलीने मात्र बाजी मारली आहे. कारण त्याचे अनुष्काबद्दलचे ट्विट ठरले आहे 'गोल्डन ट्विट ऑफ द इअर'...

दरवर्षी ट्विटरकडून अशा प्रकारच्या ट्रेंडचा रिपोर्ट देण्यात येतो. त्यामध्ये दरवर्षी एका ट्विटची निवड करण्यात येते. 2016 मधील लोकप्रिय ट्विट म्हणून विराटच्या ट्विटची निवड झाली आहे. 

विराट कोहलीने केलेल्या या ट्विटला एक लाखापेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तर या ट्विटचे चाळीस हजारांहून अधिक रिट्विट झाले आहेत. 

टी-20 विश्वकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यातील विजयानंतर सोशल मिडियावर अनुष्काची खिल्ली उडवली जात होती. यावर विराट कोहलीने संताप व्यक्त केला होता. 

अनुष्काची बाजू घेत 'अनुष्काची खिल्ली उडवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे'. अनुष्काकडून मला नेहमीच सकारात्मकता शिकायला मिळाली आहे', असे टि्वट करुन विराटने टीकाकारांना उत्तर दिले होते.   

Web Title: Virat Kohli's Tweet Supporting Anushka Sharma is The Golden Tweet