Virender Sehwag : मुंबईच्या फलंदाजासाठी सेहवाग आला धावून; म्हणाला हा पाहिजेच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virender Sehwag Batting For Opener Prithvi Shaw

Virender Sehwag : मुंबईच्या फलंदाजासाठी सेहवाग आला धावून; म्हणाला हा पाहिजेच!

Virender Sehwag Batting For Opener Prithvi Shaw : भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्येच गारद झाल्यानंतर टी 20 संघात मोठे बदल केले जावे अशी मागणी होत आहे. संघातील केएल राहुल, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक यासारख्या अनुभवी खेळाडूंचा आता नारळ देण्याची वेळ आल्याचीही चर्चा माजी क्रिकेटपटू करत आहेत. अशातच भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग पृथ्वी शॉसाठी जोरदार बॅटिंग केली. विरेंद्र सेहवाग म्हणाला की, पृथ्वी शॉ हा ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात असायला हवा होता.

हेही वाचा: MC Mary Kom : मेरी कोम, पीव्ही सिंधूची इंडियन ऑलिम्पिक समितीवर झाली निवड

आयपीएल असो किंवा देशांतर्गत क्रिकेट, पृथ्वी शॉने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मात्र तरी देखील निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत क्रिकबझशी बोलताना विरेंद्र सेहवाग म्हणाला की, 'तो टी 20 संघात नाही तो वनडे संघात नाही. तो कसोटीही बऱ्याच काळापासून खेळलेला नाही. मला वाटते की त्याने पुनरागमन करावे. मला तो 2023 च्या टी 20 वर्ल्डकप संघात असेल अशी आशा आहे.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

सेहवाग पुढे म्हणाला की, 'पृथ्वी शॉने वरच्या फळीत फलंदाजी करताना 150 चे स्ट्राईक रेट राखले आहे. तो टी 20 क्रिकेटसाठी योग्य आहे. तुम्ही त्याला निदान राखीव खेळाडू म्हणून तरी संघासोबत ठेवले पाहिजे.' पृथ्वी शॉची 18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यावर देखील निवड करण्यात आलेली नाही. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र टी 20 वर्ल्डकपमधून ज्या प्रकारे भारतीय संघ बाहेर पडला ते पाहता त्याला काही महिन्यात टीम इंडियामध्ये संधी मिळेल अशी आशा आहे.