Video: सामन्यादरम्यान ब्रिटिश पंतप्रधानांच्या मागे लागले पोलिस?

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन मागे लागले पोलीस
 eng vs nz fan entered stadium british pm boris johnson
eng vs nz fan entered stadium british pm boris johnson

Cricket Funny video: क्रिकेटच्या मैदानावर दिवसंदिवस चाहत्यांचे विचित्र वागणं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी थेट मैदानात जातात, तर अनेक चाहते सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये अनोखी वेशभूषा प्रधान करून येतात. इंग्लंडमध्ये सामन्यादरम्यान असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. ज्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रेम मिळत आहे. (eng vs nz fan entered stadium british pm boris johnson race for police)

 eng vs nz fan entered stadium british pm boris johnson
मयांक इंग्लंडसाठी रवाना; रोहितसाठी बीसीसीआयचा 'बॅकअप प्लॅन'

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्यादरम्यान हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम (Yorkshire Cricket Ground) मध्ये एका चाहत्याने असे काही केले आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांच्या वेशभूषेत एका व्यक्तीने स्टेडियममध्ये प्रवेश केला. ज्याला पकडण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस त्या व्यक्तीला पकडण्यासाठी धावताना दिसत आहेत.

 eng vs nz fan entered stadium british pm boris johnson
उमरानने नव्हे तर भुवनेश्वरने मोडले शोएबचे वर्ल्ड रेकॉर्ड?

व्हिडिओमध्ये दिसणारे पोलीस खरे पोलीस नसून त्या व्यक्तीचे मित्र आहेत. म्हणजे सामना पाहण्यासाठी आलेले काही चाहतेच सामन्यादरम्यान अशा वेशभूषेत धावले, ज्याने इतर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन पण झाले. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 113 धावांची गरज आहे. ऑली पोप 81 आणि जो रुट 55 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडने इंग्लंडला 296 धावांचे लक्ष्य दिले आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने पहिले 2 कसोटी सामने जिंकले आहेत. क्लीन स्वीप टाळण्यासाठी किवी संघाला हा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. शेवटच्या दिवशी किवी गोलंदाज इंग्लंडचे 8 विकेट घ्यायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com