esakal | KBC च्या खेळात सेहवागनं घेतली दादाची फिरकी
sakal

बोलून बातमी शोधा

KBC च्या खेळात सेहवागनं घेतली दादाची फिरकी

KBC च्या खेळात सेहवागनं घेतली दादाची फिरकी

sakal_logo
By
सुशांत जाधव

बॉलिवडूचे शहंशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला 'कौन बनेगा करोडपती 13' (Kaun Banega Crorepati 13) हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. या कार्यक्रमात प्रत्येक शुक्रवारी आता वेगवेगळ्या क्षेत्रातील खास मंडळी सहभागी होणार आहेत. 3 सप्टेंबरला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागसह (Virender Sehwag) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमात सहभाग घेताना दिसणार आहेत.

'कौन बनेगा करोडपती 13' च्या शुक्रवारच्या मेगा एपिसोडची एक झलक शो सोनी टेलिव्हिजनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलीये. यात अमिताभ बच्चन आणि विरेंद्र सेहवाग यांच्यातील मजेदार संवाद पाहायला आणि ऐकायला मिळतो. क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करताना सेहवाग गुणगुणत असल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. यावरुनच अमिताभ बच्चन सेहवागला गाण्यासंदर्भात प्रश्न विचारतात.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान दोन्ही संघाकडून खेळणारा क्रिकेटर माहितीये?

यावर सेहवागने किशोरदांच्या गाण्याचा आधार घेत उत्तर दिल्याचे पाहायला मिळते. ज्यावेळी बच्चन विरुला फिल्डिंगवेळी कॅच सुटला तर काय मनात येते, असा प्रश्न करतात. यावरही सेहवागने कार्यक्रमात सोबत असलेल्या माजी कर्णधाराचीच फिरकी घेताना पाहायला मिळते. जर कोच ग्रेग चॅपल असतील तर "अपनी तो जैसे तैसे कट जाएगी... आपका का क्या होगा.." या गाण्यातून गांगुलीची मजा घेताना दिसते. गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. याच गोष्टीला सेहवागने उजाळा दिल्याचे पाहायला मिळते. गांगुली त्याला रिप्लाय कसा देणार हे कार्यक्रमावेळीच कळेल.

हेही वाचा: कोहलीबद्दल कसोटी मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बोलला रूट

पाकिस्तानसंदर्भात सेहवागनं हाणला शहंशाह चित्रपटातील डायलॉग

पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकल्यानंतर काय प्रतिक्रिया देशील? असा प्रश्नही या प्रमोमध्ये अमिताभ बच्चन सेहवागला विचारताना दिसते. यावर सेहवाग बिग बींच्या शहंशाह चित्रपटातील 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं' हा डायलॉग मारताना दिसते. सेहवागच्या या उत्तरानंतर गांगुली खळखळुन हसताना दिसते.

loading image
go to top