

Yashasvi Jaiswal Backed as India's Future Opening Star
Esakal
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीला कोणी खेळावं याबाबत मोठं विधान केलय. सध्या वैभव सूर्यवंशीची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र वीरेंद्र सेहवागनं वैभव सूर्यवंशी ऐवजी दुसऱ्याच खेळाडूचं नाव घेत तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीला खेळण्यासाठी योग्य असल्याचं म्हटलंय. वैभव सूर्यवंशीचं सगळेच कौतुक करत असताना सेहवागने सलामीवीर म्हणून रोहित शर्माचा योग्य उत्तराधिकारी यशस्वी जयस्वाल असल्याचं म्हटलंय.