Virender Sehwag : फलंदाजी करताना शोएबकडे पाहत नव्हतो कारण... विरूने सांगितला भन्नाट किस्सा

विरेंद्र सेहवागने शोएब अख्तरला मोठ्या रन-अपवरून काढला चिमटा
Virender Sehwag
Virender Sehwag ESAKAL

Virender Sehwag Shoaib Akhtar Video : भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात मैदानावर टनश होतीच मात्र मैदानाबाहेर देखील हे दोघे एकमेकांना चिमटे काढण्यात मागे नाहीत. आता हे दोन दिग्गज दुबईत इंटरनॅशनल लीग टी 20 स्पर्धेदरम्यान भेटले.

हे दोघे समालोचन करण्यासाठी दुबईत दाखल झाले आहेत. यावेळी देखील या दोघांमध्ये एकमेकांना चिमटे काढण्यासाठी चढाओढ सुरू होती. शोएब अख्तरने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला.

Virender Sehwag
ILT20 : मुकेश अंबानींच्या संघानं अदानींच्या संघाला दिली मात; टिम डेव्हिडनं 273 च्या स्ट्राईक रेटनं धुतलं

या व्हिडिओत विरेंद्र सेहवाग शोएब अख्तरच्या मोठ्या रन-अपवरून चेष्टा करताना दिसतोय. सेहवाग शोएबच्या मोठ्या रन-अपवरून थट्टा करत म्हणाला, 'मी फलंदाजी करताना मान खाली घालून उभा राहत होतो. कारण शोएब आपला रनअप पूर्ण करण्यासाठी जवळपास 10 ते 15 सेकंद घेत होता.' शोएब व्हिडिओ शेअर करत म्हणाला की, आपले प्रिय विरू भाई मला माझ्या मोठ्या रनअपमुळे त्याला किती वाट पहावी लागत होती हे सांगत आहे.

व्हिडिओत सेहवाग म्हणतो की, 'मी खाली मान घालत होतो कारण मला माहिती होतं की शोएबला क्रीजपर्यंत पोहचण्यासाठी अजून 10 ते 15 सेकंद लागणार आहे.' तुझे लक्ष विचलीत होत होते का असे अख्तरने विरूला विचारले त्यावर सेहवाग म्हणाला की, माझ्या मनात हा बुटावर चेंडू टाकणार का, बीमर मारणार का, डोक्यावर मारणार का असे विचार यायचे.'

Virender Sehwag
IND vs ENG : मायदेशात विराट भारी की चेतेश्वर..? गोलंदाजीत तर एकच नाव

विरेंद्र सेहवाग सोबत त्यावेळी वकार युनूस आणि वसिम अक्रम देखील उपस्थित होते. अख्तर म्हणाला की, मला वाटलं ही चर्चा फक्त गोलंदाजांसाठी आहे. इथं हा संथ ऑफ स्पिनर काय करतोय. यावर सेहवागने उत्तर दिलं की शोएब पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याचं काम माझं आहे. तुझं नाही.'

यानंतर या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये वसिम अक्रम आणि वकार युनिस देखील जोडले गेले. त्यावेळी शोएबने विरूला घाबरू नको गेल्या वेळी आपण तिघं खेळत होतो त्यावेळी तू तुझा चष्मा साफ करत होतास असा चिमटा काढला. त्यावर सेहवागने उत्तर दिलं की सनसनी निर्माण करणे चांगली गोष्ट आहे. मात्र कंट्रोल चष्मा साफ करून आता तुझा सुंदर चेहरा पाहण्यासाठी मी लेन्स घालतो.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com