Virender Sehwag : भारतीय संघाची घोषणा होताच सेहवागने जय शाह यांच्याकडे केली मोठी मागणी

Virender Sehwag Wants 'Bharat' On Indian Players' Jersey In World Cup
Virender Sehwag Wants 'Bharat' On Indian Players' Jersey In World Cup

ODI World Cup 2023 Virender Sehwag : क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कपमध्ये सहभागी झालेल्या बहुतांश खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. वनडे संघाची घोषणा होताच वीरेंद्र सेहवागने बीसीसीआयकडे मोठी मागणी केली. सेहवाग अनकेदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

Virender Sehwag Wants 'Bharat' On Indian Players' Jersey In World Cup
WC23 Team India Squad : सूर्यकुमारपेक्षा भारी आकडेवारी, तरीही संघातून वगळलं, संजू सॅमसनवर अन्याय?

वीरेंद्र सेहवागने ट्विट करत म्हटले आहे की, माझा नेहमीच विश्वास आहे की नाव असे असले पाहिजे ज्यामुळे आपल्या अभिमान वाटले. आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव 'भारत' परत मिळण्यास बराच वेळ लागला आहे. मी बीसीसीआय आणि जय शाह यांना विनंती करतो की या वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर भारत लिहिले जावे.

Virender Sehwag Wants 'Bharat' On Indian Players' Jersey In World Cup
World Cup 2023:'इथं विचारलत तिथं विचारु नका', विश्वचषकावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला रोहित शर्माची ताकीद

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये सेहवागने लिहिले की, 1996 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्स हॉलंडच्या रूपात वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात आले होते. त्यानंतर 2003 मध्ये जेव्हा तो आम्ही त्याच्याबर खेळलो तेव्हा तो नेदरलँड होता आणि तो अजूनही तसाच आहे. ब्रिटीशांनी म्यानमारला दिलेले नाव बर्माने बदलले आहे. याशिवाय आणखी बरेच लोक त्यांच्या मूळ नावावर बदले आहे.

Virender Sehwag Wants 'Bharat' On Indian Players' Jersey In World Cup
World Cup 2023: KL राहुल की इशान किशनमध्ये कोणाला मिळणार संधी? अजित आगरकर स्पष्टच बोलले

यानंतर माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, टीम इंडिया नाही. टीम भारत या वर्ल्ड कप मध्ये आम्ही कोहली, रोहित, बुमराह, जडेजा यांचा जयजयकार करत आहोत, त्यामुळे आशा आहे की आमच्या हृदयात भारत असेल आणि खेळाडू त्यांच्यावर 'भारत' लिहिलेली जर्सी घालतील.

Virender Sehwag Wants 'Bharat' On Indian Players' Jersey In World Cup
World Cup 2023: युझवेंद्र चहलला न घेणं टीम इंडियाचा सेफ झोन? सोशल मीडियावर चर्चा

एका यूजरने लिहिले की, गौतम गंभीरच्या आधी तुम्ही खासदार व्हायला हवे होते यावर माझा नेहमीच विश्वास आहे. यावर सेहवागने लिहिले की, "मला राजकारणात अजिबात रस नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दोन्ही मोठ्या पक्षांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. बहुतेक मनोरंजन करणाऱ्यांनी किंवा खेळाडूंनी राजकारणात येऊ नये, असे माझे मत आहे. मला क्रिकेटवर जेव्हा सोयीस्कर असेल तेव्हा समालोचन करणे आवडले पण खासदार असणे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com