'सर्वात कमी महत्व दिला गेलेला खेळाडू' म्हणत सेहवागच्या रहाणेला शुभेच्छा

Virender Sehwag Wishes Happy Birthday To Ajinkya Rahane
Virender Sehwag Wishes Happy Birthday To Ajinkya Rahaneesakal

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आज 34 वा वाढदिवस (Birthday) आहे. या निमित्ताने देशातील आजी माजी खेळाडूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा (Wishes) वर्षाव केला. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दिलेल्या शुभेच्छा हटके होत्या. विशेष म्हणजे विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आपल्या हटके ट्विटसाठीच ओळखला जातो.

Virender Sehwag Wishes Happy Birthday To Ajinkya Rahane
Khelo India : 18 वर्षाच्या हर्षदाने 152 किलो वजन उचलत केला राष्ट्रीय विक्रम

टीम इंडियाने 2020 - 21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या अनुपस्थिती अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते. या दौऱ्यावर भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला होता. त्यानंतर टीम इंडिया मालिकेत उभारी घेईल असे वाटत नव्हते. मात्र कठिण काळात अजिंक्य रहाणेने जबाबदारी घेतली.

त्यानंतर ही कसोटी मालिका इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने कसोटी मालिकेत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केले. भारताला हा ऐतिसहासिक विजय मिळवून देणारा अजिंक्य आज 34 वर्षांचा झाला आहे.

Virender Sehwag Wishes Happy Birthday To Ajinkya Rahane
मी कुटुंबासोबत असणं गरजेचं होतं पण...रूटने मनातील सल बोलून दाखवली

रहाणेच्या वाढदिवसानिमित्त अनेक माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. विरेंद्र सेहवागने ट्विट केले की, 'सर्वात कमी महत्व दिल्या गेलेल्या खेळाडूंपैकी एक, एक असा व्यक्ती ज्याने भारताला त्याचा सर्वात मोठा कसोटी विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणेला वाढदिवसाच्या शुभेच्छा. इश्वर तुम्हाला सगळ्या आव्हानांचा सामना करण्याची शक्ती देवो.'

विरेंद्र सेहवाग पाठोपाठ चेतेश्वर पुजाराने देखील रहाणेला शुभेच्छा दिल्या. त्याने ट्विट केले की, 'वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अजिंक्य रहाणे भाई. येणाऱ्या वर्षात तुम्हाला आनंद आणि यश मिळो.'

हरभजन सिंगने देखील ट्विट करून अजिंक्य रहाणेला शुभेच्छा दिल्या. तो म्हणतो, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजिंक्य रहाणे. कायम हसत रहा. येणारा पुढचा काळ जबरदस्त असणार आहे.'

Virender Sehwag Wishes Happy Birthday To Ajinkya Rahane
बीडच्या अविनाशने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला

अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दिबद्दल बोलायचे झाले तर त्याने 192 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 8268 धावा केल्या आहेत. त्याने 82 कसोटी सामन्यात 38.52 च्या सरासरीने 4931 धावा केल्या असून 90 वनडे सामन्यात त्याने 2962 तर टी 20 क्रिकेटमध्ये 20 सामन्यात 375 धावा केल्या आहेत.

रहाणेने आपल्या क्रिकेट कारकिर्दित अनेक रेकॉर्ड देखील बनवले आहेत. तो ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मॅन ऑफ द मॅच होणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. याचबरोबर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू आहे. याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com