
भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. यानंतर सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याचे अनेक बड्या व्यक्ती अभिनंदन करत आहेत.