नॉर्वेतील बुद्धिबळ ‘ब्लिट्‌झ’ स्पर्धेत भारताचा आनंद तिसरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

स्टॅव्हॅंजर (नॉर्वे) - भारताचा विश्‍वनाथन आनंद याने येथील ‘ब्लिट्‌झ’ बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. स्पर्धेत वेस्ली सो याने विजेतेपद, तर हिकारू नाकामुराने दुसरा क्रमांक मिळविला. आनंदने नऊ फेऱ्यांमध्ये एकूण ५.५ गुणांची कमाई केली. नाकामुरा आणि आनंद दोघांचेही ५.५ गुण झाले होते. सो याने दोघांवर अर्ध्या गुणांची आघाडी मिळवत विजेतेपद मिळविले. आनंदने लेवॉन अरोनियन, डिंग लिरेन आणि मॅक्‍सिम लॅग्रेव यांच्यावर विजय मिळविला. फॅबिआनो कॅरुआनाकडून त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य पाच लढती त्याने बरोबरीत सोडवल्या.

स्टॅव्हॅंजर (नॉर्वे) - भारताचा विश्‍वनाथन आनंद याने येथील ‘ब्लिट्‌झ’ बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. स्पर्धेत वेस्ली सो याने विजेतेपद, तर हिकारू नाकामुराने दुसरा क्रमांक मिळविला. आनंदने नऊ फेऱ्यांमध्ये एकूण ५.५ गुणांची कमाई केली. नाकामुरा आणि आनंद दोघांचेही ५.५ गुण झाले होते. सो याने दोघांवर अर्ध्या गुणांची आघाडी मिळवत विजेतेपद मिळविले. आनंदने लेवॉन अरोनियन, डिंग लिरेन आणि मॅक्‍सिम लॅग्रेव यांच्यावर विजय मिळविला. फॅबिआनो कॅरुआनाकडून त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य पाच लढती त्याने बरोबरीत सोडवल्या. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला मायदेशातील स्पर्धेत ३.५ गुणांसह आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Web Title: viswanathan anand chess competition