VVS Laxman : ICC क्रिकेट कमिटीवर व्हीव्हीएस लक्ष्मणची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VVS Laxman Selected In ICC Men Cricket Committee

VVS Laxman : ICC क्रिकेट कमिटीवर व्हीव्हीएस लक्ष्मणची नियुक्ती

दुबई : आयसीसीने (ICC) मंगळवारी प्रसिद्धी पत्राकाद्वारे डॅनियल व्हिटोरी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांची आयसीसी पुरूष क्रिकेट समितीवर (ICC Men's Cricket Committee) नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांची करंट प्लेअर प्रतिनिधी श्रेणीतून नियुक्ती झाली आहे. तर रॉजर हार्पर यांची पास्ट प्लेअर प्रतिनिधी श्रेणीतून नियुक्ती करण्यात आली आहे. महेला जयवर्धने देखील या समितीवर निवडला गेला आहे.

हेही वाचा: IND vs WI: फ्लॉप गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवत धवन चूक सुधारणार?

दरम्यान, आयसीसी बोर्डाने पुढची आयसीसी चेअरमन (ICC Chairman) निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यास देखील परवानगी दिली आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होईल. ही निवड बहुमताद्वारे करण्यात येणार आहे. नव्या आयसीसी चेअरमनचा कालावधी 1 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे.

हेही वाचा: WTC Final : मक्तेदारी! 2023 अन् 2025 ची फायनल देखील लॉर्ड्सवरच

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) 2023 आणि 2025 ची फायनल ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवरच (Lords Cricket Ground) खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने (ICC) 'आंतरराष्ट्रीय बोर्ड ऑफ काऊन्सिलने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची 2023 आणि 2025 ची फायनल लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर आयोजित करण्याला परवानगी दिली आहे.' असे प्रसिद्धी पत्रकात सांगितले. हे पत्रक आयसीसीने मंगळवारी प्रसिद्ध केले.

Web Title: Vvs Laxman Selected In Icc Men Cricket Committee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketICCVVS Laxman
go to top