Wasim Akram : तुझ्या काकाच्या मुलाला जर... बाबरने विराटची स्वाक्षरी घेतली अन् अक्रमची सटकली

Wasim Akram Babar Azam IND vs PAK
Wasim Akram Babar Azam IND vs PAK esakal

Wasim Akram Babar Azam IND vs PAK : भारताने वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव करत आपला सलग तिसरा विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली तर फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा ठोकल्या.

सामना झाल्यानंतर पराभूत कर्णधार बाबर आझमने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची टीम इंडियाच्या जर्सीवर स्वाक्षरी घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मात्र या फोटोमुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम जाम भडकला. त्याने बाबरवर चांगलाच जाळ काढला.

Wasim Akram Babar Azam IND vs PAK
Olympics In India: भारत भूषवणार ऑलिंपिकचे यजमानपद ? वाचा काय आहे मोदींचा प्लॅन!

अक्रमने ए - स्पोर्ट्सशी बोलताना बाबरने टी-शर्टवर विराट कोहलीची स्वाक्षरी घेण्यावर टीका केली. विराट आणि बाबरचे हे फोटो जगभरात व्हायरल झाले. यानंतर अक्रमने बाबरला एक महत्वाचा सल्ला दिला.

अक्रम म्हणाला, 'मी ज्यावेळी हे फोटो पाहिले त्यावेळी मला वाटले की हे करण्याचा आजचा दिवस नाही. जर तुम्हाला हवंच आहे. तुमच्या काकाच्या मुलाने सांगितलं आहे की कोहलीचा टी - शर्ट पाहिजे तर तुम्ही हे सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये करू शकता.'

सामन्यानंतर बाबर आझमने पाकिस्तानी संघ आजच्या सामन्यात आत्मविश्वासपूर्वक खेळला नाही हे मान्य केले. पाकिस्तानने 280 ते 290 धावांचे टार्गेट ठेवणे अपेक्षित होते. मात्र त्यांना फक्त 191 धावाच करता आल्या.

Wasim Akram Babar Azam IND vs PAK
World Cup 2023 : 'बुमराहपासून तुम्हाला वाचायचे असेल तर निवृत्ती घ्या...' माजी दिग्गज कर्णधाराने फलंदाजांना दिला सल्ला

बाबर आझम सामन्यानंतर म्हणाला की, 'आम्ही चांगली सुरूवात केली होती. मी आणि इमामने चांगली भागीदारी रचली. रिझवान आणि मी देखील जोखीम न घेता खेळण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आमची फलंदाजी अचानक ढासळली. आम्ही चांगल्या प्रकारे फिनिश करू शकलो नाही.'

'जशी आम्ही सुरूवात केली आम्ही 280 ते 290 धावा करणं अपेक्षित होतं. नवीन चेंडूवर गोलंदाजी करताना देखील आम्ही आमच्या लौकिकास साजेसी गोलंदाजी केली नाही. रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com