esakal | स्मृती मानधना भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल | Smriti Mandhana
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Mandhana

स्मृती मानधना भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय पुरुष क्रिकेट संघात स्प्लिट कॅप्टन्सीअंतर्गत खांदे पालट होणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले. त्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या भविष्यातील कॅप्टन्सीसंदर्भात चर्चा रंगत आहे. महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. भारताची सलामीची बॅटर स्मृती मानधना भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल, असे रमेश पोवार यांनी म्हटले आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर स्मृती मानधना नेतृत्व करताना दिसेल, असे ते म्हणाले.

सध्याच्या घडीला आम्ही भविष्यातील संघ बांधणीच्या दृष्टीने काही गोष्टींचा विचार करत आहोत. यात संघाच्या नेतृत्वासंदर्भातील महत्वपूर्ण मुद्द्याचाही समावेश आहे. यासाठी कोणतीही घाई गडबड होणार नाही. टी-20 वर्ल्ड कपनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे रमेश पोवार यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर पोवारांनी हे वक्तव्य केले.

हेही वाचा: Video: चिमुरडी ढसाढसा रडली; मग माहीनेच फुलवलं चेहऱ्यावर हसू!

ते म्हणाले की, सध्या स्मृती मानधना भारतीय महिला संघाच्या उप-कर्णधार आहे. ती भविष्यात संघाचे नेतृत्व करेल. बीसीसीआय आणि निवड समितीचे सदस्य यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेतील. मागील दोन-तीन वर्षांपासून ती संघाची नियमित सदस्य आहे. एवढेच नाही तर तिची कामगिरीही बहरदार राहिली आहे, अशा शब्दांत मुख्य प्रशिक्षकांनी स्मृती मानधनावर कौतुकाचा वर्षाव केला.

हेही वाचा: Video : पंतचा एकहाती फटका, धोनी-ठाकूर बघतच राहिले

भारतीय महिला संघाच्या वनडे आणि कसोटीचे नेतृत्व हे मिताली राजकडे आहे. तर टी-20 संघाची धूरा ही हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. त्यामुळे आगामी काळात स्मृती मानधना तिन्ही प्रकारात भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणार की मितालीच्या जागी वनडे आणि कसोटी संघाची धूरा तिच्या खांद्यावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top