आम्ही ना सर्वोत्तम, ना संभाव्य विजेते अर्जेंटिना कर्णधार लिओनेल मेस्सीचे चाहत्यांसमोर मत 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

मेस्सी गटातील आव्हानाबद्दल 
- आईसलॅंड, नायजेरिया, क्रोएशिया असलेला गट खूपच गुंतागुंतीचा 
- गटविजेताच होण्याचे लक्ष्य; पण हे सोपे नाही 
- आईसलॅंडने युरो स्पर्धेत अनेकांना धक्का दिला होता 
- नायजेरिया आमची कायम डोकेदुखी. सरावात त्यांनी आम्हाला हरवले आहे. (2-4 हार, मेस्सी त्या लढतीत नव्हता) 
- क्रोएशिया स्पेनसारखेच खेळतात. मध्यरक्षकांचे चेंडूवर कमालीचे नियंत्रण 

ब्यूनोस आर्यस - विश्‍वकरंडक स्पर्धेबाबत फार मोठ्या अपेक्षा बाळगू नका. आमचा संघ ना सर्वोत्तम आहे, ना संभाव्य विजेता, असे स्पष्ट प्रतिपादन अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने केले. 

मेस्सी हा अर्जेंटिनाच्या फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. तो दिएगो मॅराडोनापेक्षाही सरस आहे, असे काहींचे मत आहे. त्याने विश्‍वकरंडक जिंकून ही श्रेष्ठता सिद्ध करावी, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांची आहे. मात्र, रोनाल्डोने खासगी दूरचित्रवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत चाहत्यांना फार मोठ्या आशा बाळगू नका, असेच सांगितले. 

आम्ही संभाव्य विजेते म्हणून रशियास जात नाही. आमच्या संघात नक्कीच चांगले खेळाडू आहेत. आम्ही स्पर्धा आव्हानास तयार आहोत, असे त्याने सांगितले. अर्जेंटिना विश्‍वकरंडक जिंकू शकतो का, या प्रश्‍नास होकारार्थी उत्तर देतानाही तो सावध होता. 

अर्जेंटिना नक्कीच जिंकू शकतो. या संघाच्या क्षमतेवर माझा नक्कीच विश्‍वास आहे. आमच्या संघातील खेळाडू नक्कीच गुणवान तसेच अनुभवी आहेत; पण त्यानंतरही आमचाच संघ सर्वोत्तम आहे, असा संदेश जाऊ नये हा माझा प्रयत्न आहे. आमच्यापेक्षा त्या स्पर्धेतील काही संघ नक्कीच चांगले आहेत, असे त्याने सांगितले. 

मेस्सीने बार्सिलोनास चॅंपियन्स लीग; तसेच क्‍लब वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. याकडे लक्ष वेधल्यावर विश्‍वकरंडकासाठी मी त्यातील कोणतेही विजेतेपद देऊ शकतो, अशी टिप्पणी मेस्सीने केली. तो 13 व्या वर्षापासून बार्सिलोनाकडून खेळत आहे. यामुळे तो स्पेनकडून खेळण्यासही पात्र ठरतो. मात्र, हा विचार कधीही माझ्या मनात आला नाही. मी युरोपात खेळणार ते स्पेनकडूनच, असे सांगतानाच त्याने अर्जेंटिनातील नेवेलस ओल्ड बॉइजकडून खेळण्याची इच्छा असल्याचे सांगितले. 

मेस्सी गटातील आव्हानाबद्दल 
- आईसलॅंड, नायजेरिया, क्रोएशिया असलेला गट खूपच गुंतागुंतीचा 
- गटविजेताच होण्याचे लक्ष्य; पण हे सोपे नाही 
- आईसलॅंडने युरो स्पर्धेत अनेकांना धक्का दिला होता 
- नायजेरिया आमची कायम डोकेदुखी. सरावात त्यांनी आम्हाला हरवले आहे. (2-4 हार, मेस्सी त्या लढतीत नव्हता) 
- क्रोएशिया स्पेनसारखेच खेळतात. मध्यरक्षकांचे चेंडूवर कमालीचे नियंत्रण 

Web Title: We are not the best, nor the potential winners says messi