INDvsBAN : क्रिकेटचा आदर राखणे महत्त्वाचे : मयांक अगरवाल 

We should respect cricket says Mayank Agarwal after scoring double century against Bangladesh
We should respect cricket says Mayank Agarwal after scoring double century against Bangladesh

इंदूर : कारकिर्दीच्या सुरवातीलाच विक्रमांची रांग लावणारा भारताचा सलामीचा फलंदाज मयांक अगरवाल याच्या ध्यानीमनीही आपण काही विक्रम केल्याचे नाही. आपल्याला फक्त क्रिकेट खेळाचा आदर करणे माहित आहे आणि ते महत्वाचे वाटते असे त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 

आपल्या द्विशतकी खेळीविषयी तो म्हणाला,"विक्रम वगैरे मला माहित नाहीत. त्याचा कधीच विचार करत नाही. फलंदाज म्हणून मी एकच गोष्ट ध्यानात ठेवतो ती म्हणजे खेळत असताना कारकिर्दीत असे दिवस येतात की काही केल्या धावा होत नाहीत, लय गवसली असताना कधी चांगला चेंडू पडतो, तर कधी क्षेत्ररक्षण अफलातून झेल घेऊन तुमची खेळी संपु'ष्टात आणतो. अशा वेळी जेव्हा चांगली फलंदाजी होत असते तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा घेणे मला अधिक आवडते. क्रिकेटच्या खेळाचा आदर राखणे मला महत्त्वाचे वाटते. फलंदाजी कितीही चांगली जमत असली तरी प्रत्येक चेंडू मारायला जाणे बरोबर नाही.'' 

अजिंक्‍यबरोबरच्या भागीदारीविषयी तो म्हणाला,"प्रदिर्घ खेळी करण्याचे उद्दिष्ट होते. संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवण्याच्याच इराद्याने अजिंक्‍यसोबत भागीदारी केली. मला धावायला विशेषतः "मॅरेथॉन' धावणे मला अधिक आवडते. त्यामुळे फलंदाजी करतानाही माझे मोठी खेळी करण्याचेच लक्ष्य असते.'' दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी रुममध्ये परतल्यावर "पबजी' खेळण्यात वेळ घालवतो. 

अनुभवाची कमतरता : रसेल डोमिंगो 
बांगलादेशाच्या अपयशात अनुभवाची कमतरता असल्याचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी सांगितले. ते म्हणाले,"गेल्या सहा महिन्यात बांगलादेश संघाची हा फक्त दुसरा कसोटी सामना आहे आणि त्यातून संघातील बऱ्याच खेळाडूंना अनुभव खूप कमी आहे. अपेक्षित कामगिरी न व्हायला मला वाटते अनुभवाची कमतरता मुख्य कारण आहे. भारतीय संघ सध्या खूपच चांगल्या फॉर्मात आहे. त्यांचे फलंदाज मोठ मोठ्या खेळी सातत्याने उभारत आहेत. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला बसून विचार करून कसोटी संघाकरता कोण लायक खेळाडू आहेत आणि मर्यादित षटकांच्या सामन्याकरता कोण हे ठरवायला हवे. मलाही प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारून थोडे दिवस झाले आहेत. कसोटी क्रिकेट कसे खेळायला पाहिजे याचा चांगला अभ्यास या मालिकेतून होईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com