Shardul Thakur Wedding : मैदानावर जमलेली जोडी फोडणारा लॉर्ड शार्दुल बांधणार लग्नगाठ; तारीख झाली फिक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur Wedding Date

Shardul Thakur Wedding : मैदानावर जमलेली जोडी फोडणारा लॉर्ड शार्दुल बांधणार लग्नगाठ; तारीख झाली फिक्स

Shardul Thakur Wedding Date : भारताची अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. शार्दुल ठाकूरचा मिताली परूळकर हिच्याशी गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता. आता ते 27 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. याबाबची माहिती खुद्द मिताली परूळकरनेच दिली आहे.

हेही वाचा: WTC Points Table : दोन दिवसात कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने भारताचे काम केले सोपे

बेकिंग स्टार्टअपची फाऊंडर असलेल्या मितालीने 'आतापासूनच माझी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लग्नापूर्वीच्या विधी या 25 फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहेत.' ती पुढे म्हणाली की, 'शार्दुलचे शेड्युल पॅक आहे. तो 24 फेब्रुवारीपर्यंत खेळतच असणार आहे. तो 25 फेब्रुवारीला परत येईल. त्यानंतर मी सगळी सूत्रे हातात घेईन. आमच्या लग्नाला 200 ते 250 पाहुणे असतील अशी अपेक्षा केली आहे. संपूर्ण कार्यक्रम खूप दमवणारा असू शकतो.'

शार्दुल आपले लग्न कुटुंब आणि मित्रांच्या साथीने करणार आहे. त्याचे लग्न कर्जतमध्ये होईल. ज्यावेळी मितालीने ही माहिती दिली त्यावेळी ती लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठीच जात होती. ती यावेळी म्हणाली की, 'सुरूवातीला आम्ही गोव्यात डेस्टिनेश वेडिंग करणार होतो. मात्र लॉजेस्टिक आणि खूप लोकं लग्नाला येणार असल्याने हा प्लॅन वर्क होणं खूप अवघड झालं असतं.'

हेही वाचा: IND vs BAN Test: 'त्याला घरीच बसवा...' रोहित बाबत माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान

मितालीने लग्न हे महाराष्ट्रीयन पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले. ती म्हणाली, 'मी सध्या लग्नाचे ठिकाण निश्चित करत आहे. मी लग्नात नऊवारीच नेसणार हे नक्की आहे. बाकी विधीच्यावेळी काय घालायचं हे अजून ठरलेलं नाही. आम्ही आमचे पेहराव अजून निश्चित केलेला नाही.'