esakal | INDvsNZ : वेलिंग्टनवर बॅटिंग करायची तर...? रहाणेचा टीम इंडियाला कानमंत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya-Rahane-NZ

बेसीन रिझर्व्ह सुंदर निसर्गाने वेढलेले आहे. मी तर दोन चेंडूंच्या मधे किंवा नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असताना क्रिकेटचा विचार टाळून निसर्गरम्य नजारा बघत राहतो.

INDvsNZ : वेलिंग्टनवर बॅटिंग करायची तर...? रहाणेचा टीम इंडियाला कानमंत्र!

sakal_logo
By
सुनंदन लेले

वेलिंग्टन : संपूर्ण खुले असलेल्या बेसिन रिझर्व्हच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जोरदार वाऱ्याचे प्रमुख आव्हान सांभाळत फलंदाजी करणे हे आव्हानात्मक असते. एकदा का वारा सुरू झाला, की फलंदाजाने खेळण्यासाठी उचललेली बॅट वाऱ्यावर हेलकावे खाते. अशा वेळी तंत्राचा विचार बंद करून गरजेनुसार बदल करावा लागतो. सचिन आणि द्रविड या दिग्गजांनी मला हा अनुभव सांगितला. तोच मंत्र मी वापरणार असल्याचे अजिंक्‍य रहाणेने सांगितले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत विचारले असता रहाणे म्हणाला, हे मैदान माझ्याकरता चांगले आहे, कारण याच मैदानावर मी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. या मैदानावर सामना खेळताना केलेल्या सरावाचा उपयोग होत नाही असे नाही, पण मैदानावर वातावरण बदलत असताना ऐनवेळेस मूळच्या तंत्रात काय बदल करता याला महत्त्व असते. 

- T20 World Cup : वर्ल्डकपचा रणसंग्राम उद्यापासून; टीम इंडियासमोर कांगारुंचे तगडे आव्हान!​

वेलिंग्टन शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या आणि सुंदर निसर्गाने नटलेल्या बेसीन रिझर्व्ह मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू होताना फलंदाजांच्या पोटात गोळा येत आहे. कसोटी सामन्याकरता तयार केलेल्या खेळपट्टीचा रंग बघून दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाजांचे हात शिवशिवत असले, तरी फलंदाज "ऑल इज वेल'चे उसने अवसान आणत आहेत. 

- शास्री म्हणतात..सर्व काही सेम सेम; जागवल्या 39 वर्षांपूर्वीच्या आठवणी

वडिलांच्या जबाबदारीचा फायदा 

सामना शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता चालू होणार आहे. भारतात कसोटी सामना खेळताना 11.30 वाजता उपाहाराची सुट्टी होते. इथे सगळेच बदलावे लागणार आहे मला. मी रात्री 11.30-12 वाजेपर्यंत जागून मग सकाळी थोडा उशिराने उठणार आहे. तसे बघायला गेले तर मुलीचा बाप झाल्यापासून मला जागायची सवय झाली आहे. त्याचा फायदा होईल मला, अजिंक्‍य रहाणे हसत हसत म्हणाला. 

- Video : धोनी आणि मंडळींची 'मैफिल-ए-बाथरूम'; व्हिडीओ होतोय व्हायरल!

बेसीन रिझर्व्ह मैदान इतर मैदानांपेक्षा वेगळे असल्याचे सांगताना अजिंक्‍य रहाणे म्हणाला, बरीच क्रिकेट मैदाने मोठ्या स्टॅंडस्‌नी वेढलेली असतात. बेसीन रिझर्व्ह सुंदर निसर्गाने वेढलेले आहे. मी तर दोन चेंडूंच्या मधे किंवा नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असताना क्रिकेटचा विचार टाळून निसर्गरम्य नजारा बघत राहतो. ज्याने मला दडपण जाणवत नाही, की थकवा येत नाही इथे खेळताना.