Richa Ghosh Cricket Stadium in Siliguri
esakal
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केली. सिलिगुडी येथे लवकरच स्टेडियम बांधण्यात येणार असून त्या स्टेडियमला महिला क्रिकेटपटू ऋचा घोष हिचं नाव देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. ऋचाने नुकताच झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तिच्या सन्मानार्थ राज्य सरकार हे स्टेडियमला बांधणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.