esakal | वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये, 14 दिवसांच्या क्वारंटाईननंतर रंगणार ऐतिहासिक 'कसोटी'

बोलून बातमी शोधा

west indies, cricket, england

जागतिक संकटाच्या परिस्थितीतून सावरत  दुसऱ्या देशाचा दौरा करणारा वेस्ट इंडिज हा पहिला संघ असेल. तर या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या इंग्लंडसाठीही हा दौरा ऐतिहासिक असाच असेल.

वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये, 14 दिवसांच्या क्वारंटाईननंतर रंगणार ऐतिहासिक 'कसोटी'
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मँचेस्टर :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्याहून अधिक काळ मोकळे दिसणाऱ्या मैदानावर पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या संकटातून सावरुन अनेक देशातील क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना सराव करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पडलेला खंड भरुन काढण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज (मंगळवार) दुपारी 1 वाजता वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये दाखल झाला.

 '...तर BCCI ला IPL स्पर्धा घेण्याचा अधिकार'

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. 8 जूलै रोजी मँचेस्टरच्या मैदानातून या दौऱ्याला सुरुवात होईल. कोरोना विषाणूमुळे जगभरातील अनेक राष्ट्रांनी देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. यामुळे देशाच्या सीमाही बंद करण्यात आल्या होत्या. जागतिक संकटाच्या परिस्थितीतून सावरत  दुसऱ्या देशाचा दौरा करणारा वेस्ट इंडिज हा पहिला संघ असेल. तर या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या इंग्लंडसाठीही हा दौरा ऐतिहासिक असाच असेल.

'चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ वापरण्याऐवजी हा प्रयोग करता येईल'

दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी  या वेस्ट इंडिजचा संघ 14 दिवस क्वारंटाइन होणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ दोन विमानातून मँचेस्टरमध्ये रवाना झाला. विमानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे अंतर असावे म्हणून वेस्ट इंडिजचे खेळाडू दोन विमानातून याठिकाणी दाखल झाले आहेत. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे स्तब्ध झालेल्या क्रिकेटच्या मैदानातील खेळ या दोन संघाच्या माध्यमातून सुरु होणार आहे. 16 जूलैला दुसरा तर 24 जूलै रोजी या दोन्ही देशात तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना रंगणार आहे. या मालिकेदरम्यान जैविक सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण मालिका ही प्रेक्षकाविना खेळवली जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रेक्षकाविना सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मालिका रद्द करण्यात आली होती. प्रेक्षकाविना रंगणारी क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच मालिका ठरेल.