आधीच एवढे षटकार खाल्ले... आता मुंबई, म्हणजे दुष्काळात तेरावा महिना!

West Indies has already hit most sixes in 2 T20 matches against India
West Indies has already hit most sixes in 2 T20 matches against India

ईडन गार्डनवर प्रकाशझोतातील कसोटी सामना जेमतेम तीन दिवसांत संपल्यावर कोणाच जास्त कौतूक करण्यात आल ? आठवतय का ?....गेल्या काही महिन्यात दक्षिण आफ्रिका असो वा बांगलादेश यांच्यावर मिळवलेल्या वर्चस्वात सर्वाधिक भाव मिळाला तो गोलंदाजांनी. पण थांबा गेल्या तीन दिवसांत समोर आलेली पुढील आकडेवारी मात्र वेगळेच चित्र स्पष्ट करत आहेत.

ट्वेन्टी-२० सामन्यात भारतात भारताविरुद्ध मारण्यात आलेले सर्वाधिक षटकार

- १५  वेस्ट इंडीज (हैदराबाद २०१९)
- १२ वेस्ट इंडीज (तिरुआनंकपुरम २०१९ ) 
- ११ वेस्ट इंडीज  (मंबई २०१६) 
-  १० न्यूझीलंड (राजकोट २०१७)
-  १० श्रीलंका (इंदूर २०१७)

पाहिलत ना !! शुक्रवारी हैदबाद येथे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या या संघाने १५ षटकार मारले आणि रविवारी तिरुआनंतपुरम येथे झालेल्या सामन्यात १२ षटकार मारण्याचा पराक्रम केला. महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया किएरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात स्फोटक ख्रिस गेल आणि अणूबॉम्ब असलेला आंद्रे रसेल खेळत नाही तरिही सर्वाधिक भेदक असे बिरुद मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी सर्वाधिक षटकाराचा मार खाल्ला आहे. ....

थांबा एवढ्यावरच या आकडेवाराचा धक्का संपत नाहीय तर सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे ११ षटकार तेही वेस्ट इंडिजने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मारले होते. आता तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना येत्या बुधवारी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत आहे...म्हणजे झालेच की कल्याण !!

हे ११ षटकार कधी मारले होते माहितेय ? २०१६ मधील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतला उपांत्य सामना ! लेंडल सिमंसने पुरती धुलाई केली होती.

गेल्या महिन्यात सात धावांत सहा बळी अशी विश्वविक्रमी कामगिरी केलेला दीपक चहर, नकलबॉलची खासियत असलेला भुवनेश्वर कुमार, अनुभवी रवींद्र जडेजा आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहर हे देशात सर्वाधिक षटकार स्वीकारणारे गोलंदाज आहेत. नवोदित गोलंदाजांकडून अशी सूमार कामगिरी झाली असती तर त्यांना कोणीतर माफ केले असते, पण या तथाकथीत गोलदाजांचे काय ?  वेळीच सुधारा अन्यथा बदल नक्की आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com