

T20 World Cup 2026 West Indies squad
ESakal
टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यावेळी शाई होप या माजी विश्वविजेत्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिज विश्वचषक संघात फ्रँचायझी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. वेस्ट इंडिजने अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळली. परंतु त्या मालिकेतील बहुतेक खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान देण्यात आलेले नाही. फलंदाजांमध्ये फक्त जॉन्सन चार्ल्स, शिमरॉन हेटमायर आणि ब्रँडन किंग यांनी संघात आपले स्थान कायम ठेवले आहे.