WI vs IND 3rd ODI : विंडीजने 2006 मध्ये केला होता मोठा कारनामा; 17 वर्षानंतर पुन्हा एकदा संधी आलीये चालून

WI vs IND 3rd ODI
WI vs IND 3rd ODIesakal

WI vs IND 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्या (01 ऑगस्ट) रोजी होणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विंडीजने भारताचा 6 विकेट्स राखून पारभव करत मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती दिली होती.

WI vs IND 3rd ODI
T20 World Cup Qualifier : राशिद खानपेक्षाही भारी.... फिलिपिन्सच्या 16 वर्षीय केपलर लुकीजने केला विश्वविक्रम

विशेष म्हणजे भारत वेस्ट इंडीज विरूद्ध 2006 पासून कोणतीही वनडे मालिका हरलेला नाही. जर वेस्ट इंडीज तिसरा वनडे सामना जिंकण्यात यशस्वी झाली तर ते तब्बल 17 वर्षांनी भारताला मालिका पराभवाचा धक्का देतील. भारताचा दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सनी पराभव झालायनंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आशिया कप आणि वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून संघात प्रयोग केले जात असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, 'आम्ही कायम पुढचा विचार करतो. आशिया कप आणि वर्ल्डकप काही महिन्यातच होणार आहे. त्यामुळे आम्हाला संघात प्रयोग करावेच लागतील. आमचे काही खेळाडू दुखापतग्रस्त देखील आहे. आम्ही प्रत्येक सामना आणि मालिकेबाबत काळजी करू शकत नाही. जर असं केलं तर ती मोठी चूक ठरू शकते.'

वनडे क्रिकेटचा विचार केला तर भारताचा टी 20 स्टार सूर्यकुमार यादवला मोठी खेळी खेळण्यात अपयश येत आहे. त्याच्यावर संघ व्यवस्थापनाने अधिक विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे संजू सॅमसनला देखील संघाने अनेक संधी दिल्या आहेत. वनडेमध्ये त्याची गेल्या वर्षभरातील कामगिरी चांगली आहे.

WI vs IND 3rd ODI
India Vs Pakistan World Cup 2023 : भारत - पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला नाही तर 'या' तारखेला होणार?

या दोघांचे संघातील स्थान हे तिसऱ्या वनडे सामन्यात ते कशी कामगिरी करतात याच्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात या दोघांना देखील संधी मिळेल. इशान किशनने या मालिकेत चांगलेच प्रभावित केले आहे. त्याने सलग दोन अर्धशतकी खेळी करत आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. मात्र शुभमन गिलला एखादी मोठी खेळी करण्यात यश आलेले नाही.

गोलंदाजीत हार्दिक पांड्या नवीन चेंडू टाकतोय. मात्र टी 20 प्रमाणे तो वनडेत प्रभावी मारा करू शकलेला नाही. तर स्पीडस्टार उमरान मलिकला देखील विकेट घेण्यात यश येत नाहीये.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com