India Vs Pakistan World Cup 2023 : भारत - पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला नाही तर 'या' तारखेला होणार?

India Vs Pakistan World Cup 2023
India Vs Pakistan World Cup 2023 esakal

India Vs Pakistan World Cup 2023 Date : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा आधी 15 ऑक्टोबरला होणार होता. मात्र बीसीसीआयने सुरक्षा एजन्सीच्या विनंतीनुसार या सामन्याची तारीख बदलली आहे. स्पोर्ट्स तकने दिलेल्या माहितीनुसार हा सामना एक दिवस आधी म्हणजे 24 ऑक्टोबरला खेळवला जाण्याची शक्यता आहे. (ICCODI World Cup 2023 Schedule)

India Vs Pakistan World Cup 2023
Sanju Samson Vs Suryakumar Yadav : सूर्या की संजू... वर्ल्डकपची लॉटरी कोणाला लागणार, निर्णय उद्या होणार?

गेल्या महिन्यात बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 15 ऑक्टोबर घटस्ठापनेदिवशीच होणार होता. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. (BCCI)

मात्र बीसीसीआयला सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली होती. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाल्यास सुरक्षा यंत्रणांची तारंबाळ उडण्याची शक्यता आहे.

India Vs Pakistan World Cup 2023
Yuvraj Singh Stuart Broad : दरारा निर्माण करणाऱ्या... युवराजची निवृत्त होणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडसाठी खास पोस्ट

बीसीसीआयने देखील या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित बैठक घेतली होती. या बैठकीतच सामन्याची तारीख बदलण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. जरी भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात येणार असली तरी सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.

हा सामना शक्यतो घटस्ठापनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची घोषणा बीसीसीआय आज (दि. 31 जुलै) करण्याची शक्यता आहे. या सामन्याबरोबरच अजून काही सामन्यांची देखील तारीख बदलली जाऊ शकते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com