वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा गगनभेदी षटकार स्टँडमध्ये बसलेल्या लहान मुलाच्या डोक्याला लागला अन्... Video

west indies star Andre Russell
west indies star Andre Russell

West Indies Star Andre Russell : जिथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कॅरेबियन भूमीवर कसोटी मालिका सुरू आहे. त्याच वेळी वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू आजकाल अमेरिकेतील टी-20 मेजर लीग क्रिकेटमध्ये तांडव घालत आहे. या लीगमध्ये एकूण 6 संघ सहभागी होत असून त्यापैकी तीन संघ आयपीएल फ्रँचायझींचे आहेत.

एमआय न्यूयॉर्क, टेक्सास सुपर किंग्ज आणि लॉस एंजेलिस नाइट रायडर्स या अनुक्रमे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या उप-फ्राँचायझी आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले गेले आहेत. मोसमातील 9 व्या सामन्यादरम्यान एक अपघात झाला, ज्यात एका मुलाचा जीव वाचला.

west indies star Andre Russell
Smriti Mandhana: खराब अंपायरिंगमुळे जिंकू शकली नाही टीम इंडिया! कर्णधारानंतर आता उपकर्णधारानेही केले उपस्थित प्रश्न

लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात हा सामना खेळला गेला होता. या सामन्यात एलए नाइट रायडर्सचा पराभव निश्चितच होता, पण आंद्रे रसेलने वॉशिंग्टनच्या गोलंदाजांचा एकहाती पराभव केला. या सामन्यात रसेलने 37 चेंडूत 6-6 चौकार आणि षटकारांसह 70 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, त्याने गोळीसारखा शॉट खेळला जो स्टँडमध्ये असलेल्या लहान मुलाच्या डोक्याला लागला. यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी ताबडतोब त्याच्या डोक्याला बर्फ लावला.

west indies star Andre Russell
Harmanpreet Kaur : भारतीय कर्णधार हरमनप्रीतसोबत बांगलादेशात झाला 'अन्याय', आता BCCI काय घेणार निर्णय?

सामना संपल्यानंतर आंद्रे रसेलने त्या मुलाची भेट घेतली. त्याने त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आणि नंतर ऑटोग्राफ दिल्यानंतर त्याच्यासोबत एक फोटोही क्लिक केला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ LA नाइट रायडर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की सामना संपल्यानंतर रसेलने त्या मुलाला मैदानावर बोलावले. रसेलने मुलाच्या डोक्यावर चुंबन घेतले आणि नंतर त्याच्याशी बोलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com