INDvsWI : निवृत्त झालेला गेल खेळणार भारताविरुद्ध; विंडीजची ODI टीम जाहीर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

विश्वकरंडकानंतर खेळणार नाही म्हणून निवृत्ती जाहीर केलेल्या आणि सर्वांकडून अभिवादनही घेतलेल्या ख्रिस गेलला काही क्रिकेट सोडवत नाही. भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेत एकदिवसीय संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. 

गयाना : विश्वकरंडकानंतर खेळणार नाही म्हणून निवृत्ती जाहीर केलेल्या आणि सर्वांकडून अभिवादनही घेतलेल्या ख्रिस गेलला काही क्रिकेट सोडवत नाही. भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेत एकदिवसीय संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. 

विंडीजने भारताविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आज संघ जाहीर केला. त्यामध्ये ख्रिस गेलला स्थान देण्यात आले आहे. 

विंडीजने जाहीर केलेल्या 14 खेऴाडूंच्या संघात सलामीवीर जॉन कॅम्पबेल, रॉस्टन चेस आणि अष्टपैलू किमो पॉल यांचे पुनरागमन झाले आहे. भारत आणि विंडीज यांच्यात 8,11 आणि 14 ऑगस्टला एकदिवसीय सामने होणार आहेत. 

विंडीजचा संघ : जॉन कॅम्पबेल, एव्हिन ल्यूईस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पुरन,  रॉस्टन चेस, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओश्ने थॉमस, शेय होप, जेसन होल्डर, केमार रोच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies team declared for ODI against India