
Rohit Sharma : अर्धशतक ठोकत रोहितने केले वर्ल्ड रेकॉर्ड
West Indies Vs India: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) झुंजार अर्धशतक केले. रोहितचे हे अर्धशतक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारे ठरले. त्याने टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलचा विश्वविक्रम मागे टाकला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १९० धावा केल्या. रोहित बरोबर दिनेश कार्तिकने देखील दमदार खेळी करत १९ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी केली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सूर्यकुमार यादवला सलामीला पाठवत एक प्रयोग केला. मात्र हा प्रयोग फसला. 24 धावांची भर घालून माघारी परतला.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत भारताचा डाव एकहाती सावरला. दुसऱ्या बाजूने भारतीय मधल्या फळीतील फलंदाज एका पाठोपाठ एक मघारी जात होते. श्रेयस अय्यर (०), ऋषभ पंत (14), हार्दिक पांड्या (1) धाव करून बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माने 44 चेंडूत 64 धावांची खेळी केली.
मात्र मोक्याच्या क्षणी रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर शेवटच्या पाच षटकात दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांनी 4 षटकात 52 धावांची भागीदारी रचली. दिनेश कार्तिकने 19 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या तर अश्विनने 10 चेंडूत 13 धावांचे योगदान दिले.