WI vs IND : संघाच्या लगेजचा झाला लोचा! दुसरा टी 20 सामना उशिरा होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Indies vs India 2nd T20I Start delay Because Of problem of crucial team luggage arriving into St Kitts from Trinidad

WI vs IND : संघाच्या लगेजचा झाला लोचा! दुसरा टी 20 सामना उशिरा होणार सुरू

West Indies vs India 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी 20 सामना उशिरा सुरू होणार आहे. हा सामना सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कवर खेळवला जाणार होता. मात्र वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक काढून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणारा हा सामना आता रात्री 10 वाजता सुरू होणार आहे.

हेही वाचा: CWG 2022 Day 4 live: ज्यूडोमध्ये लिकमाबाम सुशिला देवीने रौप्य पदक केले निश्चित

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या पत्राकानुसार 'क्रिकेट वेस्ट इंडीजच्या हात नसलेल्या गोष्टीमुळे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना उशिरा सुरू होणार आहे. संघाचे लगेज (Team Luggage) वेळेवर पोहचणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजचा दुसरा सामना हा जमैकाच्या वेळेनुसार सकाळी 11.30 मिनिटांनी म्हणजे भारतात रात्रीच्या 10 वाजता सुरू होणार आहे. चाहते, प्रायोजक, प्रसारक आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या असुविधेसाठी क्रिकेट वेस्ट इंडीज खेद व्यक्त करते.

हेही वाचा: WI Vs IND : रोहित शर्मा 26 वर्षाच्या अष्टपैलूसाठी श्रेयस अय्यरला देणार का डच्चू?

सामना उशिरा सुरू होणार असल्याने स्टेडियम स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.00 वाजता खुलं होईल. याचबरोबर सामन्याची तिकिटे मैदानावरील तिटिक काऊंटरव उपलब्ध असतील. भारताने पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 68 धावांनी जिंकून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

Web Title: West Indies Vs India 2nd T20i Start Delay Because Of Problem Of Crucial Team Luggage Arriving Into St Kitts From Trinidad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..