गांगुली-कॉन्वे यांच्यातील योगायोगाचा कमालीचा चौकार

गांगुली आणि कॉन्वेमध्ये कमालीचा योगायोग दिसून येतो. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील चार गोष्टी योगायोगाच्या चौकारमधून....
Sourav Ganguly and Devon Conway
Sourav Ganguly and Devon Conway e sakal
Summary

गांगुली आणि कॉन्वेमध्ये कमालीचा योगायोग दिसून येतो. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील चार गोष्टी योगायोगाच्या चौकारमधून....

England vs New Zealand, 1st Test : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात सलामीवी डेवोम कॉन्वेने (Devon Conway) आपल्या खेळीन सर्वांनाच प्रभावित केले. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने क्रिकेटमधील दादा अर्थात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly ) याचा 25 वर्षांचा विक्रम मोडित काढत लॉर्ड्सच्या मैदानात पदार्पणात शतकी कामगिरी केली. तो इथेच थांबला नाही. तर दुसऱ्या दिवशी त्याने द्विशतक झळकावले. त्याला दुर्देवीरित्या रन आउट होऊन परतावे लागले.(कसोटीत अशा प्रकारे बाद झाल्यामुळे दुर्देवी असा शब्द प्रयोग केलाय) तोपर्यंत त्याने 125 वर्षांचा विक्रमही मोडित काढला होता. ( What A Coincidence Between Sourav Ganguly And Devon Conway Read Same to Same Things And Record)

भारतीय क्रिकेटर केएस रणजीतसिंहजी यांनी (यांच्या नावानेच आपल्याकडे रणजी स्पर्धा भरवली जाते) 1896 मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात नाबाद 154 धावांची खेळी केली होती. याशिवाय इंग्लिश क्रिकेटर डब्ल्यू जी ग्रेस यांनी 1880 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 152 धावांची खेळी केली होती. या दोन दिग्गजांचा विक्रम मागे टाकून कॉन्वेनं नवा इतिहास रचला. इंग्लंडमध्ये पदार्पणात द्विशतकी खेळी करणारा तो पहिला परदेशी क्रिकेटर ठरलाय. गांगुली आणि कॉन्वेमध्ये कमालीचा योगायोग दिसून येतो. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील चार गोष्टी योगायोगाच्या चौकारमधून....

Sourav Ganguly and Devon Conway
कोहली-शास्त्रींची व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकली का?

डावखुऱ्यांचा बर्थ डेही सेम टू सेम!

सौरव गांगुली आणि डेवोन कॉन्वे यांच्यात कमालीचे साम्य आहे. सौरव गांगुली हा डावखुऱ्या हाताने फलंदाजी करायचा आणि कॉन्वेही डावखुरा आहे ही एक कॉमन गोष्ट मानली तरी दोघांची जन्म हा 8 जूलै हा कमालीचा योगायोगच वाटतो.

दोघांनी कॅरेबियन संघाविरुद्ध खेळला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

हा किस्सा इथेच थांबत नाही. गांगुलीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात ही वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून केली होती. 11 जानेवारी 1992 मध्ये गांगुलीने ब्रिस्बेनमधील गाबाच्या मैदानात आपला पहिला वनडे सामना खेळला होता. कॉन्वेनं देखील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. ऑकलंड ईडन पार्कच्या मैदानात डेवोन कॉन्वेन पहिला आंतरारष्ट्रीय टी-20 सामना खेळला.

Sourav Ganguly and Devon Conway
ENGvsNZ : कॉन्वेनं षटकार खेचत तोऱ्यात साजरं केल द्विशतक!

कसोटी पदार्पणातही तिच पृनरावृत्ती

वनडेतील पदार्पणानंतर चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सौरव गांगुलीला टेस्ट कॅप मिळाली. 20 जून 1996 मध्ये क्रिकेटची पंढरी समजले जात असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात दादाने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून झोकात पदार्पण केले. गांगुलीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 131 धावांची धमाकेदार खेळी केली होती. न्यूझीलंडच्या कॉन्वेनंही इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानातच कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. गांगुलीच्या एक पाउल पुढे जाऊन त्याने द्विशतकी खेळी साकारली. दोघांच्या कसोटी पदार्पणातला फरक एवढाच की कसोटीत दादा मध्यफळीत संघाची जबाबदारी सांभाळायचा. दुसरीकडे कॉन्वे डावाची सुरुवात करतोय.

दादाची ODI तर कॉन्वेची टी-20 तील एन्ट्रीवेळीही कमालीचा योग

सौरव गांगुली हा भारतीय वनडे संघातील 84 वा सदस्य आहे. याचाच अर्थ वनडे पदार्पणात दादाने 84 नंबरची कॅप घातली. गांगुलीप्रमाणेच वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कॉन्वेनेही न्यूझीलंडकडून 84 क्रमांकाची कॅप घालून टी-20 मध्ये पदार्पण केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com