विराटने कोणते मोठे यश मिळवले? सांगा एकदाच; वाचा कोणी केला पुन्हा `गंभीर' आरोप

kohli
kohli

नवी दिल्ली : कर्णधार म्हणून विराट कोहलीने काहीच मोठे यश मिळवलेले नाही. ब्रायन लारा, जॅकस्‌ कॅलिस हेसुद्धा फार मोठे क्रिकेटपटू होते. त्यांनीही अनेक विक्रम केलेले आहेत; परंतु ते संघाला एकही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकले नाहीत, असे स्पष्ट मत माजी खेळाडू आणि आता भाजपचे खासदार असलेल्या गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुम्ही स्वतःचाच विचार करणे योग्य नाही. ब्रायन लारासारख्या खेळाडूने अनेक विक्रम केले, जॅकस कॅलिसही मागे नव्हता; पण संघाला ते कधीच मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकले नाहीत. आत्तापर्यंत कर्णधारम्हणून विराट कोहलीनेही असे कोणतेही भव्य यश मिळवलेले नाही. भरपूर मोठी मजल त्याला मारायची आहे, असे गंभीर स्टार स्पोर्टसच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला. गौतमचा विराट कोहली आणि त्याच्या संघावरचा काही दिवसांतला हा दुसरा "गंभीर" हल्ला आहे. विश्वकरंडकसारख्या स्पर्धात महत्त्वाच्या क्षणी दडपणाखाली सध्याचा संघ कच खातो, असे गंभीर काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता. 

चांगला खेळाडू हा आव्हानात्मक परिस्थितीत संघाला सावरून नेतो, तोच महान खेळाडू म्हणून गणला जातो, असा टोलाही गंभीरने मारला होता. आपला सध्याचा संघ साखळी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करतो; परंतु उपांत्य किंवा अंतिम सामन्यात कच खातो, असे गंभीरने म्हटले आहे. 
२०११ नंतर  भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१७ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानकडून हार स्वीकारावी लागली होती; तर २०१५ आणि २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाची चव चाखायला लागलेली आहे. 

स्वतःच्या धावांबरोबर जेव्हा मोठ्या स्पर्धा जिंकत नाही, तोपर्यंत तुमची कारकीर्द परिपूर्ण होत नाही. 
- गौतम गंभीर

What great success did Virat achieve Say it once; Read who made the serious allegations again

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com