esakal | IPL 2021 : काही तासांत खेळ कसा बिघडला; जाणून घ्या घटनाक्रम

बोलून बातमी शोधा

IPL
IPL 2021 : काही तासांत खेळ कसा बिघडला; जाणून घ्या घटनाक्रम
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 Cancelled News : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा निम्यावर गडबडली आहे. एकामागून एक प्लेयरर्स आणि स्टाफ मेंबर्सचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Covid 19 Report Positive) आल्यानंतर बीसीसीआयला (BCCI) अखेर स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा करावी लागली. देश कोरोनाच्या संकटात अडकला असताना बीसीसीआयने बायो-बबलच्या (Bio Bubble) कवचाचा ढाल म्हणून वापर करत नेहमीच्या तोऱ्यात स्पर्धा सुरु केली. युएईच्या मैदानात यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या बीसीसीआयचा विश्वास अखेर गळून पडला. सुरक्षा कवचाला छिन्नभिन्न करत कोरोना संघातील खेळाडूंपर्यंत पोहचला आणि भारतात यशस्वी स्पर्धा पार करण्याचा बीसीसीआयचा विश्वास गळून पडला. कोरोनाच्या संकाटात (corona pandemic) सुरु झालेल्या स्पर्धेत काय घडेलं आणि मांडलेला खेळ कसा विस्कटला याच्या घटनाक्रमावर एक नजर

कोरोनाने सुरुवातीलाच दिला होता दणका

मुंबईतील (Mumbai) स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे कोरोनामुळे जो सामना रद्द झाला त्याच संघातील खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) ओपनर नितीश राणा (Nitish Rana) आणि देवदत्त पदिक्कल (Devdutt Padikkal) ही मंडळी कोरोनातून सावरुन संघाला जॉईन झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ज्या वानखेडेच्या मैदानात पहिल्या टप्प्यातील सामने रंगले त्या सामन्यापूर्वी ग्राउंड्समनचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. या प्रकारानंतरही स्पर्धा सुरुच राहिली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनीही युएईमधील स्पर्धेचा दाखला देत स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असे स्पष्ट केले होते.

युएईतील स्पर्धा आणि भारतातील स्पर्धेवेळी बायोबबलमधील व्यापकता

युएईमधील स्पर्धेवेळी निर्माण करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये काही मोजके खेळाडू वगळता अनेक फ्रेंचायझींनी खेळाडूंच्या कुटुंबियांना सोबत आणण्यास निर्बंध घातले होते. काही खेळाडूंनी कुटुंबियांशिवाय स्पर्धेत सहभागी होण्यास महत्त्व दिले. यंदाच्या हंगामातील बायोबबल व्यापकरित्या वाढल्याचे दिसले. युएईत रंगलेल्या स्पर्धेपेक्षा भारतातील स्पर्धेवेळी सामन्यादरम्यान अधिक मंडळींची उपस्थिती दिसली. यामुळे बायोबबलच्या सिस्टीमचा अंदाज फोल ठरला असावा, असा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वारियर (Sandeep Warrier) यांचा कोरोना रिपोर्ट सोमवारी समोर आला. दोघेही पॉझिटिव्ह असल्याची गोष्ट समोर आली. वरुण चक्रवर्ती हा दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात खेळला होता. तो खेळाडूंच्या संपर्कात आल्यामुळे संपूर्ण संघ क्वारंटाईन झाला. परिणामी कोलकाता (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील सामना स्थगित करण्याच निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'

चेन्नईच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव

चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सीईओ काशी विश्वनाथन, बॉलिंग कोच एल बालाजी आणि टीमला घेऊन येणारा बस कंटक्टर यांचे रिपोर्ट कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. एका बाजूला या रिपोर्टर्संनी संसर्गाची व्याप्ती वाढल्याची भीती निर्माण झाली असताना बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ज्या दिल्ली कॅपिटल्स संघासोबत खेळला त्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना केल्या. एका पाठोपाठ स्पर्धेतील दुसरा संघही क्वारंटाईन झाल्याचे समोर आले.

DDCA च्या 5 कर्मचाऱ्यांना कोरोना

सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रविवारी रंगलेल्या सामन्यात मैदानात उपस्थितीत असलेल्या 5 ग्राउंडसमनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या व्यक्ती दोन्ही संघातील खेळाडूंच्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे स्पर्धेच्या संकटात आणखी भर पडली.

कोलकाता-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना स्थगित

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील दोन खेळाडूंशिवाय इतर खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले ही मोठी दिलासा देणारी गोष्ट होती. पण संघाला सात दिवस क्वारंटाईन रहावे लागणार असल्यामुळे त्यांचे सामन्याचे वेळापत्रक कोलमडले. ही फक्त स्पर्धा स्थगित करण्याची एक चाहूल होती. हा सामना रद्द झाल्यानंतरही बीसीसीआय स्पर्धा घेण्यासाठी धडपड सुरु होती. उर्वरित सर्व सामने मुंबईतील मैदानात खेळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

हेही वाचा: IPL Postpond : सोशल मीडियावर चाहते सैराट; मीम्समधून केली 'मन की बात'

मुंबईत आयपीएल स्पर्धेच्या विरोधात याचिका

बीसीसीआयने आयपीएलमधील उर्वरित सामने मुंबईच्या मैदानात खेळवण्यासाठी धडपड सुरु केल्यानंतर कोरोनाच्या काळात मुंबईत स्पर्धा होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. या बातमीसोबतच वृद्धिमान साहा आणि अमित मिश्राला यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. संक्रमणाची वाढते प्रमाण पाहून चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील सामना स्थगित करण्याची बातमी आली आणि त्यानंतर आयपीएल गव्हर्निंग बॉडीने आपतकालीन बैठक घेऊन संपूर्ण स्पर्धाच स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

what happens before IPL 2021 tournament suspended due to Covid 19 Case increase Team Staff and players