कर्णधारपद मिळताच बुमराहला आली धोनीची आठवण; म्हणाला...| Jasprit Bumrah Reaction After Becoming Captain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah

कर्णधारपद मिळताच बुमराहला आली धोनीची आठवण; म्हणाला...

टीम इंडियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात शुक्रवारपासून (०१ जुलै) बर्मिंघम येथे पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अनुपलब्ध असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर नेतृत्त्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघाचे कर्णधारपद मिळवल्यानंतर बुमराहने मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली.'यापेक्षा चांगले काहीही मिळू शकत नाही.' अशी भावना बुमराहने व्यक्त केली.(What Jasprit Bumrah Said After Being Named Captain For Edgbaston Test Against England)

हेही वाचा: VIDEO : कर्णधार जसप्रीत बुमराहला आईने पहिल्या कसोटीसाठी दिल्या टिप्स

बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. रोहित कोविड 19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

कर्णधार पद मिळणे हा एक मोठा सन्मान आहे. कसोटी सामना खेळणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते आणि अशी संधी मिळणे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे मला ही संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. यापेक्षा चांगले काहीही मिळू शकत नाही. अशी भावना बुमराहने यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा: Jasprit Bumrah : अखेर ठरलं! जसप्रीत बुमराहच टीम इंडियाचं नेतृत्व करणार

तसेच, माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावाचा उल्लेखही बुमराहने यावेळी केला. 'दबाव असताना यश मिळण्याची मजा काही वेगळीच असते. मी जबाबदाऱ्या स्विकारण्यासाठी नेहमीच तयार असतो आणि मला आव्हाने स्विकारायला आवडतात. एका क्रिकेटपटूच्या रूपात तुम्ही नेहमी दबावाच्या परिस्थितीत स्वतचे आकलन करण्याचा प्रयत्न करता. मी बऱ्याच क्रिकेटपटूंशी बोललो आहे, जे वेळेनुसार स्वत:मध्ये प्रगती करत गेले.

मला आठवण आहे की, मी जेव्हा धोनीसोबत बोललो होतो. तेव्हा त्याने मला सांगितले होते की, भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्यापूर्वी तो साधारण खेळाडू होता. त्याला नेतृत्त्वाचा कसलाही अनुभव नव्हता. पण आता त्याला सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते.” असे मत बुमराहने व्यक्त केले.

३५ वर्षानंतर...

३५ वर्षानंतर टीम इंडियाचे कर्णधारपद एका वेगवान गोलंदाजाकडे सोपवण्यात आले. यापूर्वी मार्च १९८७ मध्ये कपिल देव यांना टीम इंडियाचे कर्णधार पद देण्यात आले होते.

Web Title: What Jasprit Bumrah Said After Being Named Captain For Edgbaston Test Against England

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top