WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

Dilip Gavit inspirational success story: भारताचा पॅरा धावपटू दिलीप गावित याने पुरुषांच्या टी-४७ १०० मीटर शर्यतीत १०.७१ सेकंदांचा खेळातील विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. त्याचा सहकारी मोहम्मद बासिल मोरसिंगनाखतने १०.८३ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. इंग्लंडच्या केविन सँटोसने १०.८५ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले.
Dilip Gavit inspirational success story

Dilip Gavit inspirational success story

esakal

Updated on

Who is Dilip Mahadu Gavit Commonwealth Games gold medalist : भारतासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस अविस्मरणीय राहिला... बॉक्सिंगपटूंनी आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश करून सहा पदकं निश्चित केलेली असताना मध्यरात्री नाशिकच्या दिलीप महादू गावितने टी-४७ च्या १०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली, त्याच्यासोबत मोहम्मद बासिलने रौप्यपदक जिंकले. यासह लांब उडीत श्रीशंकर मुरलीने रौप्यपदकाची कमाई केली. महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने भारताचे हक्काचे पदक गेले. पण, कालचा दिवस अविस्मरणीय केला, तो नाशिकच्या दिलीपने... ही सुवर्ण कामगिरी त्याच्या कष्टाचे, मेहनतीचे आणि संघर्षाचे प्रतिक आहे..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com