

Who is Ferran Torres?
esakal
Who is Ferran Torres?: फिफा विश्वचषक २०२६( FIFA World Cup 2026)स्पर्धेला अखेर नवा विश्वविजेता मिळाला आहे. स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मात्र, या विजयानंतर जितकी चर्चा स्पेनच्या विजेतेपदाची होत आहे, तितकीच चर्चा एका खेळाडूचीही रंगली आहे.
लिओनेल मेस्सीचे(lionel messi ) सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंग करणारा आणि स्पेनला विश्वचषक जिंकून देणारा फेरान टोरेस नेमका कोण आहे, याची उत्सुकता आता जगभरातील फुटबॉल चाहत्यांना लागली आहे. अतिरिक्त वेळेत त्याने केलेल्या एका गोलने स्पेनला विश्वविजेता बनवलं आणि अर्जेंटिनाच्या हातातून विश्वचषक निसटला.