WPL Auction : एका डावात 10 विकेट घेणारी काशवी गौतम गुजरातच्या ताफ्यात! ठरली सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू

Who is Kashvee Gautam WPL 2024 Auction
Who is Kashvee Gautam WPL 2024 Auctionsakal

Who is Kashvee Gautam WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात काशवी गौतमवर पैशाचा पाऊस पडला. काशवीची मूळ किंमत 10 लाख रुपये होती पण तिला 2 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. तिला गुजरात जायंट्सने 20 पट अधिक किंमतीत विकत घेतले. तिने 1 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलेल्या भारताच्या वृंदा दिनेशला मागे सोडले.

भारतीय महिला क्रिकेटमध्ये चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. याचा फायदा काशवीला झाला. गुजरात व्यतिरिक्त, यूपी आणि आरसीबी संघ देखील काशवीला विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते, परंतु दोन्ही संघांच्या पर्समध्ये इतके पैसे नव्हते. याच कारणामुळे काशवी गुजरातच्या ताफ्यात आली.

कोण आहे काशवी गौतम?

काशवी 2020 मध्ये प्रकाशझोतात आली जेव्हा तिने अंडर-19 वनडे ट्रॉफीमध्ये तिच्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. चंदीगडचे कर्णधार असताना काशवीने अरुणाचल प्रदेश संघाच्या सर्व 10 विकेट घेतल्या. यात हॅट्ट्रिकचाही समावेश होता. एवढेच नाही तर तिने फलंदाजी करत 49 धावा करत संघासाठी योगदान दिले.

एसीसी इमर्जिंग आशिया कप जिंकणाऱ्या संघाचा काशवी देखील एक भाग होती. तिने अलीकडेच बीसीसीआयच्या वरिष्ठ महिला आंतर विभागीय टी-20 ट्रॉफीमध्ये हॅटट्रिकही केली. याच कारणामुळे तिला भारत अ मध्ये स्थान मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com