Who Is Vishal Jaiswal
esakal
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचलेल्या विराट कोहलीने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे. वि़जय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात विराटने शानदार शतक झळकावलं, तर दुसऱ्या सामन्यात त्याने तुफानी अर्धशतकीय खेळी केली. या सामन्यातही तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र विशाल जैस्वाल नावाच्या एका गोलंदाजाने त्याला जाळ्यात अडकवत माघारी धाडलं. विशेष म्हणजे त्याने दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतलादेखील बाद करत शतकापासून वंचित ठेवलं.