Yoane Wissa celebrates DR Congo's historic World Cup goal
esakal
Yoane Wissa scores historic World Cup goal for DR Congo: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला पहिल्याच सामन्यात दुबळ्या डीआर काँगोकडून १-१ अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. २१ व्या मिनिटाला आघाडी घेतल्यानंतर पोर्तुगाल बाजी मारेल असे वाटले होते, परंतु पहिल्या हाफच्या भरपाईवेळेत योआन विसाने हेडरद्वारे भन्नाट गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये १-१ अशा बरोबरीची कोंडी फोडण्यात पोर्तुगालला अपयश आले आणि त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. ५२ वर्षानंतर वर्ल्ड कप खेळणाऱ्या मध्य आफ्रिकन देशाचा हा पहिलाच वर्ल्ड कप गोल ठरला अन् त्यांचा पहिलाच गुणही ठरला.