
Video: स्कूप मारणे Shubman Gill च्या आले अंगलट; नेटकऱ्यांनी केलं प्रचंड ट्रोल
टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारतीय संघाने रविवारी दुसरा एकदिवसीय सामना 2 गडी राखून जिंकत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी आहे. दुसऱ्या वनडेत टीम इंडियाने 312 धावांचे लक्ष्य 2 चेंडू आधी गाठले. या सामन्यात अक्षर पटेलने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. मात्र सामन्यात शुभमन गिल ज्या पद्धतीने आऊट झाला त्यामुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहे.(shubman gill attempts scoop gets dismissed in bizarre fashion)
हेही वाचा: VIDEO | Chess Robot : बुद्धीबळ खेळणाऱ्या 7 वर्षाच्या मुलाचे रोबॉटने तोडले बोट
शुभमन गिलला सलग दुसऱ्या सामन्यात शानदार सुरुवात मिळाली. गिलच्या बॅटमधून 49 चेंडूत 43 धावा आल्या त्यात त्याने 5 चौकार मारले. गिलने चांगली फलंदाजी करत होता, पण ज्या प्रकारे त्याने विकेट गमावली ती खरोखरच धक्कादायक होती. गिलने 16व्या षटकात काइल मायर्सच्या चेंडूवर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या समोरच्या टोकाला लागून गोलंदाजाकडे गेला. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे.
हेही वाचा: BCCI चे पैसे संपले! दीपक हुड्डाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली?
टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत ऋतुराज गायकवाडच्या जागी शुभमन गिलला सलामीची संधी दिली. पहिल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले. यावेळीही त्याला मोठी खेळी खेळण्याची संधी होती पण चांगली सुरुवात केल्यानंतर त्याने आपली विकेट दिली. गिलला टीम इंडियात आपले स्थान पक्के करायचे असेल तर त्याला अर्धशतकानंतर शतक करावे लागेल जेणेकरून व्यवस्थापनाला त्याला काढण्यापूर्वी थोडा तरी विचार करावा लागेल.
Web Title: Wi Vs Ind Shubman Gill Attempts Scoop Gets Dismissed In Bizarre Fashion West Indies Vs India Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..