esakal | Wimbledon : जोकोविचची पाऊले चालती मोठ्या रिंगणाची वाट!
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic vs Denis Shapovalov

Wimbledon : जोकोविचची पाऊले चालती मोठ्या रिंगणाची वाट!

sakal_logo
By
सुशांत जाधव

वर्ल्ड नंबर वन नोवोक जोकोविचने कॅनडाचा टेनिस स्टार डेनिस शापोवालोव याचा प्रवास सेमी फायनलमध्ये थांबवत विम्बल्डनची फायनल गाठली. 22 वर्षीय डेनिस शापोवालोव याने 2016 मध्ये ज्यूनिअर विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. जोकोविचने 7-6, 7-5, 7-5 अशा फरकाने ज्यूनिअर विम्बल्डन चॅम्पियनला पराभूत केले. स्वित्झर्लंड स्टार रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमी ग्रँडस्लॅमची बरोबरी करण्याच्या इराद्याने जोकोविच फायनलसाठी कोर्टवर उतरेल. फेडरर आणि नदालने प्रत्येकी 20-20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. (Wimbledon 2021 2 nd Semifinal Novak Djokovic Win against Denis Shapovalov and Now Met Berrettini In Final)

विम्बल्डनची फायनल जिंकून जोकोविचला दोन दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामात जोकोविचने ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली असून कॅलेंडर ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या दिशेने तो आणखी एक पाऊल टाकेल. दुसरीकडे ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीने गोल्डन स्लॅमचे रिंगण पूर्ण करण्याची संधी त्याच्यासाठी निर्माण होईल. याचा अर्थ त्याचा प्रवास हा ऐतिहासिक रिंगण पूर्ण करण्याच्या दिशेनं सुरु आहे. विम्बल्डन स्पर्धेतील फायनल जिंकून तो या पराक्रमाच्या आणखी जवळ जाईल.

हेही वाचा: ICC पुरस्काराचा 'स्नेह'

नोवाक जोकोविच रविवारी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील 30 वी ग्रँडस्लॅम फायनल खेळण्यासाठी कोर्टवर उतरणार आहे. आतापर्यंत त्याने 19 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. यंदाच्या हंगमात तो कमालीची कामगिरी करताना दिसतोय. प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेत किमान सहा वेळा फायनल खेळणारा जोकोविच एकमेव खेळाडू आहे.

हेही वाचा: Wimbledon : फेडररला आउट करणारा हिरो बेरेट्टिनीसमोर ठरला झिरो!

जोकोविचसमोर आता सातव्या मानांकित इटलीच्या मॅट्टेओ बेरेट्टिनी याचे आव्हान असेल. इटलीच्या स्टारने रॉजर फेडररला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या हुबेर्ट हुर्काझ याला पराभूत करत फायनल गाठली आहे. मागील 45 वर्षांच्या इतिहासात ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये पोहचणारा मॅट्टेओ बेरेट्टिनी हा पहिला खेळाडू ठरलाय. त्याच्यापूर्वी 1976 मध्ये अँड्रियानो पेनेटा यांनी फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. 25 वर्षीय बेरेट्टिनी 2019 मध्ये विम्बल्डनच्या सेमीफायनलपर्यंत पोहचला होता. फायनलमध्ये तो उटलफेर करत नवा इतिहास रचणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image