Wimbledon : सानिया मिर्झा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wimbledon Sania Mirza and Mate Pavic reach semi-finals of the mixed doubles

Wimbledon : सानिया मिर्झा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत

लंडन : भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा मॅट पेव्हिक (Sania Mirza Mate Pavic) या मिश्र दुहेरीतील जोडीने चौथी सिडेड जोडी गॅब्रेएला डाब्रोव्हस्की आणि जॉन पीर्स यांना हरवून विम्बल्डनची (Wimbledon) उपांत्य फेरी गाठली आहे. सहाव्या सिडेड सानिया आणि मॅटने हा सामना 6-4, 3-6, 7-5 असा जिंकला. सानिया आपली शेवटची विम्बल्डन खेळत आहे. ती कारकिर्दित पहिल्यांदाच विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीच्या (Mix Doubles) उपांत्य फेरीत पोहचली आहे. सानियाने आपल्या फोरहँडचा योग्य प्रकारे वापर केला.

हेही वाचा: ENG vs IND Live Day 5 : जो रूटचे 28 वे शतक; भारत पराभवाच्या छायेत

सानिया आणि पॅव्हिक आता क्वाटर फायनलमध्ये खेळणाऱ्या दुसऱ्या सिडेड डेसरे आणि नेआल विरूद्ध जलेना ऑस्टापेन्को आणि सातव्या सिडेड रॉबर्ट फराह यांच्यातील विजेत्याबरोबर होणार आहे. सानिया मिर्झाने विम्बल्डनच्या महिला दुहेरीत देखील सहभाग घेतला होता. मात्र सानिया आणि चेकचा पार्टनर लुसी यांना पहिल्याच फेरीत 6-4, 4-6, 2-6 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: ENG vs IND: चाहत्याकडून मीम्सचा पाऊस; 'भारत जिकूं शकतो फक्त...'

मिश्र दुहेरीच्या सहाव्या सिडेड जोडी सानिया आणि पॅव्हिक यांनी दुसऱ्या फेरीत इव्हान डॉडिग आणि लतिशा चान यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सानिया आणि पॅव्हिक यांनी पहिल्या फेरीत डेव्हिड वेगा आणि जॉर्जिया नतेलाचा 6-4, 3-6, 7-6(3) असा पराभव केला.

Web Title: Wimbledon Sania Mirza And Mate Pavic Reach Semi Finals Of The Mixed Doubles

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..