'पेटीएम' ऑफिसमधून फोन आला अन् तिनं गमावले 47 हजार रुपये!

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली.

पुणे : सध्या ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमूक एका साईटवर भरपूर ऑफर्स आहेत. असं फक्त कळायचा अवधी. लगेच तिकडे खरेदी करणाऱ्यांची खरेदीसाठी झुंबड उडते. एकीकडे ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे फसवणुकीचे अनेक प्रकारही वाढत चालले आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

''हॅलो, मी पेटीएम ऑफिसमधून बोलतोय... तुमच्या खात्याची केवायसी करायची बाकी आहे. तुम्ही त्यासाठी पेटीएम खात्यावर डेबिट कार्ड स्कॅन करा,'' असे सांगून एका महिलेची 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

या प्रकरणी बालेवाडी येथील एका महिलेने (वय 40) तक्रार दिली आहे. त्यावरून चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- 'ती' जाहिरात अक्षय कुमारच्या अंगलट; पोलिसांत तक्रार दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या मोबाईलवर कॉल केला. मी पेटीएमधून बोलत असल्याचे सांगून केवायसीसाठी पेटीएम खात्यावर तुमचे डेबिट कार्ड स्कॅन करा असे सांगितले. त्यावर या महिलेने पेटीएमच्या खात्यावर डेबिट कार्ड स्कॅन केल्यानंतर 70 हजार रुपये खात्यातून गायब झाल्याचे दिसून आले.

- पुणे : कमिन्स इंडिया कंपनीत 43 लाखांच्या स्पेअर पार्ट्सचा अपहार

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस निरीक्षक माया देवरे करीत आहेत.

- Video : उजनी जलाशयात उतरले परदेशी पाहुणे; पाहा कोण कोण आलेय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman was accused of cheating Rs 47000 from Paytm Online payment