'ती' जाहिरात अक्षय कुमारच्या अंगलट; पोलिसांत तक्रार दाखल

Sambhaji brigade filed complaint against actor Akshay Kumar for Nirma washing powder advertisement
Sambhaji brigade filed complaint against actor Akshay Kumar for Nirma washing powder advertisement

पुणे: जाहिरातीमधून राष्ट्रपुरुष आणि मावळ्यांची बदनामी केल्याप्रकरणी सिनेअभिनेता अक्षय कुमार यांच्या विरोधात दाखल करण्यात यावा, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.



अक्षय कुमारने या जाहिरातीमध्ये मावळ्यांचे कपडे घालून, शिंदे शाही पगडीसह 'निरमा वॉशिंग पावडर'ची जाहिरात करत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी रक्त सांडून इतिहास घडवला कर्तृत्व सिद्ध केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले, त्या मावळ्यांचा जाहिरातीमध्ये असा अपमान करणे हा राष्ट्रपुरुषांचा अपमान आहे. 'शिंदेशाही पगडी' घालून अटकेपार झेंडे फडकावले. शिंदे-होळकरांचा इतिहास महाराष्ट्रासह देशभर, जगभर अभिमानाने सांगितला जातो. हेच मावळे लढाई करून आल्यानंतर त्यांच्या घरातील महिला त्यांना हिनवून बोलतात, असा आरोप संभाजी ब्रिगेडमार्फेत केला आहे.
Video : उजनी जलाशयात उतरले परदेशी पाहुणे; पाहा कोण कोण आलेय?

तसेच, या जाहिरातीमध्ये मावळे लढाई करून आल्यानंतर फक्त स्वच्छ कपडे स्वच्छ करत बसायचे असा त्यांचा त्यामागील संदेश आहे. कपडे धुण्यापुरते वा निरमा विकण्यापुरते 'मावळे' व त्यांचे कर्तुत्व उरले का, हा प्रश्न आहे.चित्रपट, कथा, कादंबऱ्या, पुस्तक व जाहिरात माध्यम यांना छत्रपती शिवाजी महाराज हे सॉफ्ट टार्गेट वाटतात. सतत बदनामी, अवहेलना किंवा चुकीची माहिती देणे हाच सर्रास धंदा सुरू आहे. सर्व प्रथम चुकीचा इतिहास मांडून प्रचंड बदनामी केली आहे असे सांगून ''जाणीवपुर्वक वादग्रस्त चुकीच्या ठिणग्या टाकू नये, अन्यथा एक दिवस गव्हासोबत किडेही रगडले जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.


पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले?

सर्वप्रथम टीव्हीवर प्रसारित होणारी ही जाहिरात तात्काळ थांबवली गेली पाहिजे. तसेच, अभिनेता अक्षय कुमार, 'निरमा' वॉशिंग पावडरचे मालक आणि जाहिरात कंपनी यांच्यावर 'राष्ट्रपुरुष' यांची बदनामी केल्याप्रकरणी, मावळ्यांची बदनामी केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा, याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास महाराष्ट्रभर या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट, संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडीचे अध्यक्ष प्रकाश धिंडले, विनायक घुले, सूर्यकांत विष्णोई आदींनी दिला आहे.
सायबर विभागाच्या पोलिस अधिकाऱयालाच बनावट 'कॉल'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com