Shreyanka Patil : W, W, W, W, W.... RCB च्या श्रेयांका पाटीलने केला धमाका; संपूर्ण संघ 34 धावात गारद

hreyanka Patil Indian Women Cricket Team
hreyanka Patil Indian Women Cricket Team esakal

Shreyanka Patil Indian Women Cricket Team : भारतीय महिला संघातील युवा अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटीलने महिला इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत धमाका केला. तिच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा 9 विकेट्स राखून पराभव केला. याचबरोबर स्पर्धेची धडाकेबाज सुरूवात केली. श्रेयांका पाटीलने या सामन्यात फक्त 2 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या श्रेयांकाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

hreyanka Patil Indian Women Cricket Team
India Tour Of West Indies : वेस्ट इंडीज दौऱ्याची तारीख ठरली! सामन्याची वेळ भारतीयांची झोप उडवणारी

20 वर्षाच्या श्रेयांकाच्या ऑफ स्पिन गोलंदाजीसमोर हाँगकाँगचा संघ 14 षटकात 34 धावात गुंडाळला गेला. हाँगकाँगकडून सलामीवीर मारिको हिलने 19 चेंडूत 14 धावा केल्या. मॅरिको बिलशिवाय हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला 5 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. कॅरी चान, एलिका हबर्ड, मरियम बीबी आणि बेट्टी चान या चार फलंदाजांना तर भोपाळाही फोडता आला नाही.

hreyanka Patil Indian Women Cricket Team
Sunil Gavaskar Rohit Sharma : उद्या अजून काही मागाल... गावसकरांनी कारणे देणाऱ्या रोहितवर काढला जाळ

भारताच्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या महिला संघातील खेळाडू मन्नत कश्यपने 2 धावात 2 विकेट्स घेतले. तर लेग स्पिनर पार्शवी चोपडाने 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. हाँगकाँगचे 34 धावांचे माफक आव्हान भारताने 5.2 षटकात एका विकेटच्या जोरावर पार केले. भारताकडून त्रीशाने नाबाद 19 धावा केल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com