SPN vs VEL : व्हिलॉसिटीने सुपरनोव्हाला दिला पराभवाचा धक्का

Women T20 Challenge Supernovas vs Velocity
Women T20 Challenge Supernovas vs VelocityESAKAL

पुणे : व्हिलॉसिटीने सुपनोव्हाचे 151 धावांचे आव्हान 18.2 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत आपला पहिला विजय मिळवला. व्हिलॉसिटीकडून शेफाली वर्मा (51) आणि लॉरा (51) यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघींना यस्तिका भाटिया (17) आणि दिप्ती शर्मा (24 ) यांनी चांगली साथ दिली. सुपरनोव्हाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार 71 धावांची खेळी करत संघाला 150 धावांपर्यंत पोहचवले. (Women T20 Challenge Velocity Defeat Supernovas)

Women T20 Challenge Supernovas vs Velocity
एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा! पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये परतणार

सुपरनोव्हाने ठेवलेल्या 151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिलॉसिटीला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. व्हिलॉसिटीची सलामीवीर नाथकम चांथमला पूजा वस्त्रकारने अवघ्या 1 धावेवर बाद केले. त्यानंतर मात्र शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटिया यांनी संघाला सावरत दुसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी डॉटिनने फोडली. तिने भाटियाला 17 धावांवर बाद केले.

दरम्यान, शेफाली वर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र डॉटिनने तिला 51 धावांवर बाद केले. व्हिलॉसिटीची 3 बाद 80 अशी अवस्था झाली असताना लॉरा आणि दिप्ती शर्मा यांनी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघींनी 71 धावांची नाबाद भागीदारी रचत संघाला विजयापर्यंत पोहचवले. लॉराने नाबाद 51 आणि दिप्ती शर्माने नाबाद 24 धावा केल्या.

महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेत आज दुसऱ्या सामन्यात सुपनोव्हा आणि व्हिलॉसिटी यांच्यात लढत होत आहे. व्हिलॉसिटीची कर्णधार दिप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत व्हिलॉसिटीच्या गोलंदाजांनी सुपरनोव्हाला पहिल्या तीन षटकात धक्के दिले.

Women T20 Challenge Supernovas vs Velocity
'Super Women' हरलीन देओलचा अप्रतिम झेल - पाहा व्हिडिओ

पहिल्याच षटकात केट क्रॉसने सलामीवीर प्रिया पुनियाला पहिल्याच षटकात 4 धावांवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात केट क्रॉसने 7 धावा करणाऱ्या हरलीन देओलची शिकार केली. तर कर्णधार दिप्ती शर्माने डेंड्रा डॉटिनला 6 धावांवर बाद करत सुपरनोव्हाची अवस्था 3 बाद 18 धावा अशी केली.

या पडझडीनंतर सुपरनोव्हाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तानिया भाटिया यांनी डाव सावरत चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. हरमनप्रीत आक्रमक फलंदाजी करत होती तर तानिया भाटिया तिला बॉल टू रन करत चांगली साथ देत होती. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. मात्र तानिया भाटिया 32 चेंडूत 36 धावा करून संघाचे शतक धावफलकावर लागले असताना धावबाद झाली.

Women T20 Challenge Supernovas vs Velocity
सायकल तुटली म्हणून ४० किलोमीटर पायी जायचा, भारतीय संघात झालीय निवड

दरम्यान, हरमनप्रीत कौरने तानिया भाटिया बाद झाल्यानंतर आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. तिने 51 चेंडूत 71 धावा चोपल्या. तिच्या या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर सुपरनोव्हा 138 धावांपर्यंत पोहचले. मात्र राधा यादवने तिला बाद करत सुपरनोव्हाला पाचवा धक्का दिला. अखेर सनी लूसने 20 धावांची खेळी करत सुपरनोव्हाला 150 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com