smriti mandhana and harmanpreet kaur
sakal
मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघावर टी-२० विश्वकरंडकात साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. यामुळे मागील वर्षी एकदिवसीय विश्वकरंडक पटकावणाऱ्या भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला. भारतीय महिला संघाच्या कामगिरीवर टीकाही होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू डायना एडलजी यांनी परखड मत व्यक्त करताना म्हटले की, भारतीय महिला क्रिकेटच्या हितासाठी आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आहे.