WPL 2024 Auction : वुमन्स प्रीमियर लीगचा लिलाव मोफत पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी अन् कोठे दिसणार लाईव्ह?

Women's Premier League 2024 Auction
Women's Premier League 2024 Auctionesakal
Updated on

Women's Premier League 2024 Auction : वुमन्स प्रीमियर लीग 2024 चा दुसरा हंगाम जवळ आला आहे. त्यासाठी 9 डिसेंबरला मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरा हंगाम हा पुढच्या वर्षी फेब्रवारी - मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.

वुमन्स प्रीमियर लीगच्या लिलावात एकूण 165 खेळाडू सहभागी होणार आहेत. यातील 104 खेळाडू या भारतीय आहेत तर 61 विदेशी खेळाडू लिलावास आपलं नशीब आजमावणार आहेत. वुमन्स प्रीमियर लीगमधील पाच फ्रेंचायजींनी एकूण 30 स्लॉट भरायचे आहेत. प्रत्येक फ्रेंचायजी जास्तीजास्त 18 खेळाडू घेऊ शकते.

वुमन्स प्रीमियर लीगचा हा लिलाव कधी अन् कोठे लाईव्ह स्ट्रीम होणार आहे याबाबतची माहिती पुढील प्रमाणे :

Women's Premier League 2024 Auction
Sreesanth Vs Gambhir : लेजंड लीग क्रिकेटनं श्रीसंतलाच धाडली नोटिस; गंभीरवर आरोप करणारे व्हिडिओ आधी काढून टाक त्यानंतरच...

वुमन प्रीमियर लीग 2024 चा लिलाव कधी होणार आहे?

वुमन प्रीमियर लीग 2024 चा लिलाव हा शनिवारी 9 डिसेंबरला होणार आहे.

लिलाव कोठे होणार आहे?

महिला क्रिकेटसाठी महत्वाचा असलेला हा वुमन्स प्रीमियर लीगचा लिलाव हा मुंबईत होणार आहे.

लिलाव किती वाजता सुरू होईल?

वुमन्स प्रीमियर लीगचा लिलाव हा भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 ला सुरू होणार आहे.

Women's Premier League 2024 Auction
MS Dhoni : जर त्यानं 20 किलो वजन कमी केलं तर... धोनी कोणत्या अफगाणी खेळाडूला चेन्नईत घेणार होता?

कोणत्या टीव्ही चॅनलवर वुमन्स प्रीमियर लीग 2024 चा लिलाव दाखवण्यात येईल?

वुमन्स प्रीमियर लीगचा लिलाव हा स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीगचा लिलाव मोफत कोठे पाहायचा?

हा लिलाव जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाईटवर मोफत लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com