WPL 2024 : वेळापत्रक झालं जाहीर! मुंबई इंडियन्स अन् दिल्लीच्या सामन्याने होणार WPL ची सुरूवात

Women's Premier League 2024 : दिल्ली - बंगळुरूमध्ये वुमन्स प्रीमियर लीगचे प्रत्येकी 11 सामने होणार
WPL 2024
WPL 2024Esakal

Women's Premier League 2024 : वुमन्स प्रीमियर लीग 2024 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे 23 फेब्रुवारीला सलामीच्या सामन्यात भिडणार असून या सामन्याने WPL च्या दुसऱ्या हंगामाचा नारळ फुटणार आहे. WPL चे यांदाचे सामने हे दिल्ली आणि बंगळुरू येथे होणार असून दिल्ली आणि बंगळुरूला प्रत्येकी 11 सामने होणार आहे.

दुसऱ्या हंगमाचा पहिला सामना हा बंगळुरू येथे होणार आहे तर अंतिम सामना हा दिल्लीत होईल. हा सामना 17 मार्च रोजी होईल.

WPL 2024
Shoaib Bashir : आधी नाकारला आता दिला! इंग्लंडच्या बशिरचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

वुमन्स प्रीमियर लीगने दिलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, 'यंदाच्या WPL मध्ये सिंगल हेडर सामने होणार आहेत. सर्व सामने हे भारतीय वेळानुसार सायंकाळी 7.30 ला सुरू होतील. हंगामातील पहिले 11 सामने हे बंगळुरू येथे होतील. त्यानंतर लीगमधील उर्वरित 9 सामने आणि दोन प्ले ऑफसह अंतिम सामना हा दिल्लीत होणार आहे.'

वुमन्स प्रीमियर लीगचा हा दुसरा हंगाम आहे. या हंगामाची सुरूवात गेल्या हंगामातील दोन फायनलिस्ट संघातील सामन्यान्याने होणार आहे. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पहिला हंगाम जिंकला होता. ते आता या हंगामात आपला खिताब वाचवण्यासाठी खेळणार आहेत.

WPL 2024
Shoaib Bashir : आधी नाकारला आता दिला! इंग्लंडच्या बशिरचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

सुरूवातीला WPL चे सामने हे आयपीएलप्रमाणेच होम अवे पद्धतीने खेळवण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता ही स्पर्धा फक्त दोन शहरात होणार आहे. बंगळुरूमधील सामने हे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. याचप्रमाणे दिल्लीतील सामने हे अरूण जेटली स्टेडियममध्ये होणार आहेत.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com