SPN vs VEL : सिमनच्या हातून बॅट अन् सामना दोन्ही निसटला

Women's T20 Challenge Supernovas vs Velocity Final
Women's T20 Challenge Supernovas vs Velocity Final esakal

पुणे : व्हिलॉसिटीच्या लॉरा वुल्फार्टचे झुंजार अर्धशतक आणि सिमरन बहादूरच्या धडाकेबाज खेळीमुळे व्हिलॉसिटीने गेलेला सामना खेचून आणत सुपरनोव्हाला धडकी भरवली. शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना वुल्फार्ट आणि सिमरने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. मात्र 1 चेंडू 6 धावा असे इक्वेशन अताना सिमरन बहादूरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्या हातून बॅट अन् व्हिलॉसिटीच्या हातून सामना निसटला. व्हिलॉसिटीकडून लॉराने झुंजार 65 तर सिमरनने 10 चेंडूत 20 धावा केल्या. महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा जिंकणाऱ्या व्हिलॉसिटीकडून एलना किंग्जने 3 तर सोफी एकलस्टोन आणि डॉटिनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. फलंदाजीतही डॉटिनने 62 धावांची आणि हरमनप्रीतने 43 धावांची खेळी केली. (Laura Wolvaardt Simran Bahadur Fight But Supernovas Defeat Velocity in Women's T20 Challenge)

Women's T20 Challenge Supernovas vs Velocity Final
आजवर हार्दिक एकही IPL फायनल हरला नाही, मुंबईप्रमाणे गुजरात लकी ठरेल?

सुपरनोव्हाचे 166 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या व्हिलॉसिटीची सुरूवात खराब झाली. डॉटिनने शेफाली वर्माला 15 धावांवर बाद करत व्हिलॉसिटीला पहिला धक्का दिला. त्यानंतर एकलस्टोनने पहिल्यांदा यस्तिका भाटियाला 13 धावावंर बाद केले. त्यानंतर किरन नवगिरेचा शुन्यावर त्रिफळा उडवला. यामुळे पॉवर प्लेमध्येच व्हिलॉसिटीची अवस्था 3 बाद 38 अशी झाली.

यानंतर नाथकम चंथम आणि लॉरा वुल्फार्ट संघाला अर्धशतकापर्यंत पोहचवले. मात्र पूजा वस्त्रकारने चंथमला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेली दिप्ती शर्मा 2 धावांची भर घालून माघारी परतली. दरम्यान, लॉराने झुंजार खेळ करत संघाला 16 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र अलनाने याच षटकात पाठोपाठ दोन विकेट घेतस्नेह राणाला 15 तर राधा यादवला शुन्यावर बाद करत व्हिलॉसिटीची अवस्था 7 बाद 104 धावा अशी केली.

केट क्रॉसने देखील 13 धावांची भर घालून वुल्फार्टची साथ सोडली. अखेर वुल्फार्टने 34 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. तिला साथ देण्यासाठी आलेल्या सिमरन बहादूरने पूजा वस्रकारच्या 19 व्या षटकात सलग तीन चौकार मारत 17 धावा वसूल केल्या. त्यामुळे सामना 6 चेंडूत 17 धावा असा आला.

शेवटचे षटक टाकणाऱ्या एकलस्टोनला वॉल्फर्टने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत सामना 5 चेंडू 11 धावा असा आणला. मात्र त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर एक एक धाव झाल्याने सामना 3 चेंडूत 9 धावा असा आला. वुल्फार्टने तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. आता व्हिलॉसिटीला विजयासाठी 2 चेंडूत 7 धावांची गरज होती. स्ट्राईकवर असणाऱ्या वॉल्फार्ट एक धाव घेणचे शक्य झाले. आता स्ट्राईकवर सिमरन बहादूर होती. विजयासाठी 1चेंडूत 6 धावांची गरज असताना तिने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्या हातून बॅट अन् सामना दोन्ही निसटला.

Women's T20 Challenge Supernovas vs Velocity Final
अफगाणचा रशीद खान जगतोय लक्झरी लाईफ; आहे कोट्यावधीचा मालक

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणाऱ्या व्हिलॉसिटीला सुपरनोव्हाची सलामी जोडी प्रिया पुनिया आणि डॉटिन यांनी चांगलेच दमवले. या जोडीने 73 धावांची सलामी दिली. यात अर्धशतक ठोकणाऱ्या डॉटिनचा मोठा वाटा होता. मात्र ही जोडी सिमरन बहारूने फोडली. तिने प्रिया पुनियाला 28 धावांवर बाद केले.

मात्र त्यानंतर डॉटिन आणि हरमनप्रीत कौरने डाव पुढे नेण्यास सुरूवात केली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचत संघाला 15 षटकात 130 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र दिप्ती शर्माने 44 चेंडूत 62 धावा करणाऱ्या डॉटिनचा त्रिफळा उडवला. यानंतर सुपरनोव्हाच्या धावगतीला ब्रेक लागण्यास सुरूवात झाली. दरम्यान, पूजा वस्त्रकार 5 धावांची भर घालून परतली. त्यानंतर 29 चेंडूत 43 धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा अडसर केट क्रॉसने दूर केला.

सेट झालेली हरमनप्रीत 18 व्या षटकात बाद झाल्यानंतर सुपरनोव्हाच्या इतर फलंदाजांना फारशी भर घालता आली नाही. अखेर सुपरनोव्हाने 20 षटकात 7 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com