esakal | Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचं भारतापुढं डोंगरा एवढं आव्हान; भारत दबावाखाली
sakal

बोलून बातमी शोधा

women's t20 world cup australia sets 185 target to India

अंतिम सामन्यात या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानंच ऑस्ट्रेलियाच्या महिला मैदानावर उतरल्याचं दिसत होत्या.

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचं भारतापुढं डोंगरा एवढं आव्हान; भारत दबावाखाली

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) Women's T20 World Cup : मेलबर्नच्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट गाऊंडवर सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय महिलांच्या पुढं 185 रन्सचं आव्हानात्मक टार्गेट ठेवलंय. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीनं केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळं त्यांना 184 रन्सपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाच्या या फटकेबाजीमुळं अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. फिरकीच्या जोरावर भारतीय महिलांनी अंतिम फेरीत मजल मारली होती. पण, या फिरकीची जादू अंतिम सामन्यात अजिबात चालली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पर्धेच्या सालामीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 17 रन्सनी पराभव केला होता. अंतिम सामन्यात या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानंच ऑस्ट्रेलियाच्या महिला मैदानावर उतरल्याचं दिसत होत्या. ऑस्ट्रेलियाच्या खेळाची सुरुवातच अतिशय दमदार झाली. त्यांच्या बेथ मूनी आणि ऍल्सा हिली यांनी तुफानी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या विकेटसाठी 115 रन्सची भागीदारी केली. ऍल्सा हिली हिनं 39 बॉल्समध्ये 75 रन्सची तुफानी खेळी केली. त्यात सहा सिक्सरचा समावेश होता. त्यातले तीन सिक्सर तर तिनं एकाच ओव्हरमध्ये मारले होते. शिखा पांडेची अकरावी ओव्हर तर, भारतासाठी प्रचंड महागात पडली. त्या ओव्हरमध्ये हिली आणि मूनी यांनी 23 रन्स अक्षरशः कुटल्या. त्या एका ओव्हरमध्ये भारतीय खेळाडू अक्षरशः खचल्याचं दिसत होत्या. याच ओव्हरमध्ये हिलीनं सलग तीन सिस्कर मारून भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. 

स्पोर्टसच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

भारताला राधा पांडेनं 13व्या ओव्हरमध्ये पहिलं यश मिळवून दिलं. हेलीनं लॉंग ऑनला कॅच दिला. कृष्णमूर्तीनं तिचा कॅच घेतला. त्यानंतर भारताला दीप्ती शर्माच्या 17 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट मिळाल्या. लेनिंगला शिखा पांडेनं कॅच घेऊन माघारी पाठवलं तर, अॅशलेज् गार्डनरला तानिया भाटियाच्या चपळ स्टंपिंगमुळं माघारी जावं लागलं. हिली आणि या दोन विकेट पडल्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या फटकेबाजीला थोडाफार लगाम बसला. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 200 रन्सचा टप्पा गाठतो की काय असे वाटत असताना, त्यांच्या फटकेबाजीला थोड्या मर्यादा आल्या. मूनी आणि हेनिस यांची पार्टनशीर धोकादायक वाटत असतानाच पूनम यादवनं 19व्या ओव्हरमध्ये हेनिसला बोल्ड केलं. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव 184 रन्सवर मर्यादीत ठेवण्यात भारताला यश आलंय. 

loading image