Women's World Cup : पाकला भिडण्यापूर्वी हरमनप्रीतचा मास्टर स्ट्रोक

Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur Sakal

दिल्ली :आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप (ICC Women's World Cup 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज या लढतीने वर्ल्ड कप स्पर्धेचा शुभारंभ होईल. भारताचा पहिला सामना 6 मार्चला पाकिस्तान विरूद्ध (India vs Pakistan) होणार आहे. 2017 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने इंग्लंड विरूद्ध फायनल खेळली होती. या सामन्यात 9 धावांनी पराभूत झाल्यामुळे भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अधूरे राहले. त्या हंगामातील वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध हमरप्रीतने 171 धावांची नाबाद खेळी केली होती.

यंदाच्या स्पर्धेत तिची कामगिरी महत्त्वाची असेल. गेल्या काही दिवसांपासून हरमनप्रीतचा फॉर्म खराब असल्याच बोलल जात होत. पण वर्ल्ड कप आधी तिला सूर गवसला आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात तिने अवघ्या 33 धावा काढल्या होत्या. न्यूझीलंडविरूदध टी-20 मध्ये 12 धावा करण्यात तिला यश आले. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्येही Big Bash League (BBL) ती नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरली होती. मध्ये ही काही खास खेळी प्रेक्षकांना दिसली नाही.

Harmanpreet Kaur
Record @100 : शंभराव्या कसोटीत Century करणारे फलंदाज

पण आता वर्ल्ड कप 2022 च्या मुख्य लढतीला सुरुवात होण्यापूर्वी हरमनप्रीतचा फॉर्मनं टीम इंडियाची डोकेदुखी कमी केलीये. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेत 63 धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीतनं सराव सामन्यात धमाका केला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सराव सामन्यात तिने 104 धावांची दमदार खेळी केली.

पाकिस्तान विरुद्ध भिडण्यापूर्वी 107 धावांची खेळी आत्मविश्वास वाढवण्यास फायदेशीर ठरेल, असे हरमनप्रीतनं म्हटलं आहे. या खेळीमुळे 30- 40 धावांच्या कामगिरी बाजूला ठेवण शक्य होईल, असेही तिने म्हटले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचही तिने स्पष्ट केले आहे.

Harmanpreet Kaur
IPL 2022: ...तर कवडी मोलाचा रैना होईल गुजरात टायटन्सचा 'अनमोल रतन'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com