World Athletics Championship: ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राला पीएम मोदींनी दिल्या खास शुभेच्छा

नीरज चोप्राने वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले.
 PM Top Leaders Wish Neeraj Chopra
PM Top Leaders Wish Neeraj Chopraesakal
Updated on

नीरज चोप्राने वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( World Athletics Championship) भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. त्याच्या या ऐतिहासीक कामगिरीनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला खास शुभेच्छा दिल्या आहेत. (PM Top Leaders Wish Neeraj Chopra)

'आपल्या देशाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या नीरज चोप्राने मोठे यश संपादन केले आहे. या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खास क्षण आहे. नीरज चोप्राला त्याच्या पुढील स्पर्धेसाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा.' अशा आशयाचे ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

 PM Top Leaders Wish Neeraj Chopra
World Athletic Championships :Neeraj Chopraची पहिली प्रतिक्रिया; हवा प्रतिकूल, स्नायूही दुखावला...

यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.१३ मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. यापूर्वी २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने भारतासाठी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकमेव पदक जिंकले होते. पॅरिस येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीत त्याने कांस्यपदक पटकावले.

 PM Top Leaders Wish Neeraj Chopra
World Athletics Championships : Neeraj Chopra ची ऐतिहासिक कामगिरी; 19 वर्षानंतर भारताने जिंकले पदक

नीरज चोप्राच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. नीरजच्या या शानदार विजयाच्या आनंदात घरातील लोक एकमेकांना मिठाई खाऊ घालत आहेत. या ऑलिम्पिक चॅम्पियनच्या विजयाच्या आनंदात त्याच्या घरातील महिला आणि नातेवाईक गाताना आणि नाचताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com